
नाशिक : साखर आयुक्तालयाने दिलेल्या सूचनांनुसार अहमदनगर प्रादेशिक विभागातील नगर व नाशिक जिल्हा सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी २०२१-२२ गाळप हंगामासाठी उपलब्ध असलेल्या उसाचे संपूर्णपणे गाळप होईल यादृष्टीने नियोजन करावे, असे प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर मिलिंद भालेराव यांनी कळविले आहे.
अहमदनगर प्रादेशिक विभागातील सर्व सहकारी व खासगी कारखान्याकडे ऊस उत्पादकांचा नोंदणी न झालेला आणि गाळपास उपलब्ध असलेल्या सर्व उसाचे गाळप होईल याबाबत दक्षता घेण्याबाबत कारखान्यांचे कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर, शेतकी अधिकारी, केन मॅनेजर यांना साखर आयुक्तांनी कळविले आहे. ऊस नियंत्रण आदेश १९६६ तसेच महाराष्ट्र साखर कारखाने (क्षेत्र आरक्षण, गाळप आणि ऊसपुरवठा नियमन) आदेश १९८४ मधील तरतुदीनुसार व गाळप परवान्यातील अटीनुसार साखर आयुक्त कार्यालयाच्या परवानगीशिवाय साखर कारखान्यांनी गाळप हंगाम बंद करू नये. तसेच प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने याबाबत साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या परिपत्रकीय सूचनांनुसार कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. पैशाची मागणी होत असल्यास तक्रार करा सूचना देऊनही ऊसतोडणी मजूर व मुकादम यांच्याकडून ऊसतोडणीकरिता पैशाची मागणी होत असल्यास संबंधित कारखान्याच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच कोणत्याही ऊस उत्पादकांना ऊसतोडणीसाठी ऊसतोडणी कंत्राटदार, ऊसतोडणी मजूर व कारखाना प्रतिनिधी यांनी पैशाची मागणी केल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांकडे पुराव्यानिशी तक्रार करावी, असेही भालेराव यांनी कळविले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.