जवान अन् किसान देशाचे आधारस्तंभ:छगन भुजबळ 

नाशिक: सैनिक जसे देशाचे रक्षण करतात, तसेच समाजानेही सैनिकांचा आदर, सन्मान करायला हवा. तसेच शेतकरी हा अन्नदाता असून त्याच्या कष्टकरी हातांनाही बळ दिले पाहिजे. जवान अन किसान देशाचे आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
Pillar of Jawan and Kisan Desha: Chhagan Bhujbal
Pillar of Jawan and Kisan Desha: Chhagan Bhujbal

नाशिक: सैनिक जसे देशाचे रक्षण करतात, तसेच समाजानेही सैनिकांचा आदर, सन्मान करायला हवा. तसेच शेतकरी हा अन्नदाता असून त्याच्या कष्टकरी हातांनाही बळ दिले पाहिजे. जवान अन किसान देशाचे आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.  येवला येथे रविवार(ता.२३) रोजी वीरचक्र पुरस्कारार्थी कचरू साळवे यांच्या निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, वीरचक्र पुरस्कार प्राप्त कचरू साळवे, माजी आमदार कल्याणराव पाटील, माजी जि.प.अध्यक्षा  राधा सोनवणे, सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.       भुजबळ म्हणाले की, ‘‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्ताने वीरचक्र पुरस्करार्थी कचरू साळवे यांच्या निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजन ही खूप आनंदाची बाब आहे. पुढील वर्षी ह्याच दिवशी गृहप्रवेश करण्यात यावा. घराचा पाया रचण्याचा बहुमान हा एका शेतकरी जोडप्याला देऊन  ‘जय जवान जय किसान’ आपण एकप्रकारे या दोघांचा गौरव केल्याचे त्यांनी नमूद केले.’’           मुलींसाठी सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र  श्री.भुसे यावेळी म्हणाले, ‘‘माजी सैनिक, शहीद कुटुंब यांच्या कार्याचे मोल होऊ शकत नाही म्हणून त्यांच्याविषयी आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शासन नेहमी प्रयत्नशील आहे. बाळासाहेब ठाकरे माजी  सैनिक सन्मान योजनेंतर्गत महाराष्ट्राचे मूळ निवासी असलेल्या माजी सैनिक माजी सैनिकांच्या विधवांना, वीर जवानांच्या अवलंबितांना त्यांच्या नावे असलेल्या एका मालमत्तेवर कर माफी देण्यात आली आहे. औरंगाबाद येथील मुलांसाठी येणाऱ्या प्रशिक्षण केंद्राच्या धर्तीवर नाशिक येथे मुलींसाठी सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहे.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com