पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत होणार 

मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे प्रकल्पाचा मुख्य कालावा ६.५४ कि.मी.मध्ये बंदिस्त नलिकेद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या विशेष दुरुस्तीचा कामास ७.३६ कोटी एवढ्या रकमेस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत होणार 
Pipe canal will save 60% of water

मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे प्रकल्पाचा मुख्य कालावा ६.५४ कि.मी.मध्ये बंदिस्त नलिकेद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या विशेष दुरुस्तीचा कामास ७.३६ कोटी एवढ्या रकमेस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या अनुषंगाने बोरी अंबेदरी, दहिकुटे पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत होणार असल्याची माहितीमंत्री भुसे यांनी बैठकीत दिली. 

बोरी अंबेदरी, दहिकुटे पाइप कालवा कामांचे नियोजन आढावा बैठक नुकतीच राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. या बैठकीला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित रौदंळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी  दिलीप देवरे, कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, आदिसह लाभ क्षेत्र भागातील शेतकरी उपस्थित होते. या कामाचे अंदाजपत्रक रक्कम ७ कोटी ३५ लाख ३९ हजार ६०३  इतक्या किमतीच्या अंदाजपत्रकास मुख्य अभियंता जलसंपदा विभाग यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे. ही निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचे मंत्री भुसे यांनी बैठकीत नमूद केले. या गृहितकाने प्रकल्पाचा प्रति हेक्टरी विसर्ग हा रब्बी हंगामाकरीता १४८ क्युसेक प्रति हेक्टरी इतका आहे. खरीप हंगामाकरिता ८५ क्युसेक प्रति हेक्टरी इतका परिगणित होतो.           कार्यक्षेत्राची स्थलाकृती निहाय सिंचन क्षेत्र सुटसुटीत सिंचन व्यवस्थानचा विचार करता या कालव्यावरून सिंचनाचे नियोजन हे १२  दिवस आवर्तण कालावधीमध्ये दोन टप्पांमध्ये प्रस्तावित करण्यात आले आहे. बैठकीत मध्य भारत व्यवसाय प्रमुख कृष्णात महामूलकर यांनी उपस्थितांना सादरीकरणाद्वारे माहिती दिली. लाभक्षेत्र भागातील शेतकऱ्यांनी बैठकीत भाग घेऊन योजनेची माहिती घेतली व त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.         आपल्या गावामध्ये सर्वेक्षणासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. शेतकरी कंपनी स्थापन करावयाची असून, ३० टक्के योजना महिलासाठी आहेत. जास्तीत जास्त योजनेचा लाभ यामुळे घेता येईल, असे या वेळी कृषिमंत्र्यांनी सांगितले.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.