यावल/फैजपूर, जि.जळगाव : हवामानमापक संयंत्राची योग्य जागेवर उभारणी 

यावल/फैजपूर, जि.जळगाव : तालुक्यात डिसेंबरमध्ये कमी थंडी पडूनही हवामानमापक यंत्रे सदोष जागी बसविण्यात आल्यामुळे फळपीक विमा योजनेंतर्गत तालुक्यातील एकाही शेतकऱ्यास नुकसान मिळणार नसल्याचे जाहीर झाले आहे.
Proper placement of meteorological plant
Proper placement of meteorological plant

यावल/फैजपूर, जि.जळगाव : तालुक्यात डिसेंबरमध्ये कमी थंडी पडूनही हवामानमापक यंत्रे सदोष जागी बसविण्यात आल्यामुळे फळपीक विमा योजनेंतर्गत तालुक्यातील एकाही शेतकऱ्यास नुकसान मिळणार नसल्याचे जाहीर झाले आहे. याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्यानंतर सदोष जागी बसविण्यात आलेले हवामानमापक यंत्र योग्य जागी बसविण्याची प्रक्रिया शनिवारी (ता. २२) सुरू झाली.  तालुक्यातील बामणोद, मारुळ, डोंगरदे, हरिपुरा भागांत हवामानमापक यंत्र अयोग्य ठिकाणी बसविण्यात आले होते. तालुक्यातील हवामानमापक यंत्रे लोकवस्तीत बसविले होते. त्यात तापमान, हवामानाची अचूक नोंद होत नव्हती. यामुळे कमी तापमानाच्या नुकसान भरपाईपासून केळी विमाधारक शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले आहे. यामुळे हे यंत्र निकषानुसार मोकळ्या जागेत बसविण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली होती. मारुळ, डोंगरदे, बामणोद, हरिपुरा येथील हवामान यंत्र नव्या जागेत उभारण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.  या वेळी सुनील फिरके, जावेद जनाब, जिया उलहक, मारुळ सरपंच असद अहमद, पंचायत समिती सदस्य सर्फराज तडवी, बामणोद सरपंच राहुल तायडे, प्रमोद बोरोले, गोपाळ जावळे, सुनील केदारे, चंद्रकांत तळेले, तौफिक खान, कुंदन कोल्हे, लोमेश बोरोले, कदिर खान, अनिल जंजाळे, स्कायमेट कंपनी प्रतिनिधी नितीन पाटील, सांगवी उपसरपंच विकास धांडे आदी उपस्थित होते.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com