नाशिक: श्रमदान, लोकसहभागातून तीन दुर्गम गावे टँकरमुक्तीच्या दिशेने 

नाशिक: जिल्ह्याच्या पश्चिम भागातील आदिवासी पाड्यांवरील विविध समस्या सोडवण्यासाठी सोशल नेटवर्किंग फोरम काम करत आहे. पाणीप्रश्न सोडवण्यासाठी त्यांना ऑटोकॉप व ‘रोटरी’ कडून १२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून श्रमदान व लोकसहभागातून पेठ तालुक्यातील तीन दुर्गम गावे टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
Shramdan, three remote villages through public participation towards tanker liberation
Shramdan, three remote villages through public participation towards tanker liberation

नाशिक: जिल्ह्याच्या पश्चिम भागातील आदिवासी पाड्यांवरील विविध समस्या सोडवण्यासाठी सोशल नेटवर्किंग फोरम काम करत आहे. पाणीप्रश्न सोडवण्यासाठी त्यांना ऑटोकॉप व ‘रोटरी’ कडून १२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून श्रमदान व लोकसहभागातून पेठ तालुक्यातील तीन दुर्गम गावे टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहेत.  सोशल नेटवर्किंग फोरमच्या टँकरमुक्तीसाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे.त्यांनी उद्देश समोर ठेवलेल्या १० गावांपैकी ३ गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याकामी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पेठ तालुक्यातील डोंगरशेत, चिरेपाडा आणि मोहाचापाडा ही गावे गेली अनेक वर्षे पाण्याच्या समस्येला तोंड देत आहेत.डिसेंबरनंतर येथील गावकऱ्यांना दऱ्याखोऱ्यातून पाण्याचा शोध घेऊन वणवण भटकावे लागते. या गावांची माहिती मिळताच काही महिन्यांपूर्वी सोशल नेटवर्किंग फोरमच्या टीमने गावची पाहणी करून एक पर्याय देण्यासाठी तसा प्रस्ताव तयार केला होता.त्यावर तातडीने निर्णय घेत या तीन गावांसाठी सिन्नरच्या ॲटोकाँप कंपनी व ‘रोटरी क्लब ऑफ नाशिक’ ने मदतीचा हात दिला.        यासाठी ‘ऑटोकाँप’ चे संचालक अरविंद नागरे, वृषाली नांगरे, अरविंद नामजोषी, प्रतापसींग धाडीवाल, रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा श्रीया कुलकर्णी, सचिव मंगेश अपशंकर, विनायक देवधर, सिएसआर प्रतिनीधी कमलाकर टाक, सिएसआर सदस्य सुजाता राजेबहादूर, दत्तकग्राम प्रतिनिधी हेमराज राजपूत, सोशल नेटवर्किंग फोरमचे निधी संकलक डॉ.पंकज भदाणे, अध्यक्ष प्रमोद गायकवाड आणि ग्रामस्थ यांचा उपक्रमात सक्रिय सहभाग राहिला आहे.  येत्या दोन महिन्यात ही तीनही गावं पाण्यासाठी स्वयंपूर्ण होताना पाहणं हे आमच्यासाठी खूप आनंददायी असेल,अशी भावना सोशल नेटवर्किंग फोरम व सदस्यांची आहे.  - प्रमोद गायकवाड, अध्यक्ष-सोशल नेटवर्किंग फोरम  पाड्यावर पाणी उपलब्ध नसल्याने अडचणी आहेत.हा प्रश्न सोडवण्यासाठी मदतीचा हात दिला आहे.त्यामुळे १५०० नागरिकांसह ४०० जनावरांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.पुढे जलसंधारण कामांना चालना दिली जाणार आहे,त्यासाठी पाठबळ देण्यात येणार आहे.  - डॉ.श्रीया कुलकर्णी ,अध्यक्ष-रोटरी क्लब ऑफ नाशिक   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com