खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू 

जळगाव : खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. उत्पादन कमी असून, एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन काही शेतकऱ्यांना हाती आले आहे. काढणी किंवा मळणी हंगाम आणखी १५ ते २० दिवस सुरूच राहणार आहे.
खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू 
Tur harvesting season begins in Khandesh

जळगाव : खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. उत्पादन कमी असून, एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन काही शेतकऱ्यांना हाती आले आहे. काढणी किंवा मळणी हंगाम आणखी १५ ते २० दिवस सुरूच राहणार आहे. अनेक शेतकऱ्यांची तूर मळणीवर आली आहे. काही शेतकरी तूर कापणी करीत आहेत. अनेकांनी तूर कापून ठेवली असून, शेंगा चांगल्या वाळण्याची प्रक्रिया पूर्ण करून घेतली जात आहे.  जळगावात मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड, रावेर, अमळनेर, पारोळा आदी भागांत तूर पीक अधिक आहे. धुळ्यात साक्री, शिंदखेडा भागात पीक आहे. तर इतर भागांत कापूस पिकात आंतरपीक म्हणून तुरीचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. खानदेशात यंदा सुमारे आठ हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली होती. लागवड स्थिर आहे. मुक्ताईनगर, रावेर भागात अनेक शेतकऱ्यांनी ठिबकवर दर्जेदार वाणांची लागवड मे महिन्यात केली होती. मे, जूनमधील कृत्रिम जलसाठ्याच्या माध्यमातून वाढविलेल्या तुरीची मळणी अनेकांनी पूर्ण केली आहे. तर कोरडवाहू क्षेत्रात तूर कापणी सुरू आहे. या पिकातही मळणी लवकरच सुरू होईल. मुक्ताईनगर, रावेर भागांत अनेक शेतकऱ्यांना एकरी पाच क्विंटल उत्पादन हाती आले आहे. काही शेतकऱ्यांना एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन हाती आले आहे.  यंदा पाऊसमान चांगले होते. यामुळे कोरडवाहू क्षेत्रातही तूर पीक बऱ्यापैकी होते. कोरडवाहू तुरीचे देखील चांगले उत्पादन अपेक्षित आहे. पण मध्यंतरी किंवा ऑक्टोबमधील पाऊस, विषम वातावरणाने पिकात रोगराई, अळ्यांचा प्रकोप होता. यामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बाजारात दर सध्या स्थिर आहेत. पण शेतकऱ्यांना जागेवर किमान आठ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर अपेक्षित आहे. शासकीय खरेदी केंद्रात तुरीसंबंधी नोंदणी सुरू आहे. या नोंदणीलाही प्रतिसाद मिळत आहे.  यंदा तुरीचे उत्पादन एकरी सरासरी आठ क्विंटल एवढेच येईल. चांगले व्यवस्थापन केले. यामुळे आम्हाला उत्पादन बऱ्यापैकी येईल, अशी अपेक्षा आहे.  - विशाल महाजन, शेतकरी, नायगाव (जि. जळगाव)  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.