शेतीमालाच्या विक्रीसाठी मूल्यसाखळी विकसित होणे गरजेचे - तांभाळे

सोलापूर ः शेतकरी उत्पादनात आता पुढे आहेत. त्यांना उत्पादनाच्या मार्गदर्शनाची गरज नाही. आता गरज आहे, ती शेतीमालाच्या मार्केटिंगची, त्यासाठी शेतमालाच्या विक्रीसाठी मुल्यसाखळी विकसित करावी लागेल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणेचे संचालक दशरथ तांभाळे यांनी केले.
शेतीमालाच्या विक्रीसाठी मूल्यसाखळी विकसित होणे गरजेचे - तांभाळे
Value chain needs to be developed for sale of agricultural commodities

सोलापूर ः शेतकरी उत्पादनात आता पुढे आहेत. त्यांना उत्पादनाच्या मार्गदर्शनाची गरज नाही. आता गरज आहे, ती शेतीमालाच्या मार्केटिंगची, त्यासाठी शेतमालाच्या विक्रीसाठी मुल्यसाखळी विकसित करावी लागेल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणेचे संचालक दशरथ तांभाळे यांनी केले. 

सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित दोनदिवसीय ऑनलाइन कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या सांगता समारंभांत श्री. तांभाळे बोलत होते. कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रीय तृणधान्य संशोधन केंद्र सोलापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. परशुराम पत्रोती, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नितीन शेळके यावेळी उपस्थित होते.  श्री. तांभाळे म्हणाले, ‘‘शेतकरी आपल्या अभ्यासाने, अनुभवाने विविध प्रयोग शेतीत करत आहेत. अनेक शेतकऱ्यांचे प्रयोग प्रेरणादायी आहेत. अशा शेतकऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग अन्य शेतकऱ्यांसाठीही व्हायला हवा. मार्केटिंग हा शेतीतला महत्त्वाचा विषय आहे. त्यावर सामूहिकपणे प्रयत्न व्हायला हवेत,’’ असेही ते म्हणाले. श्री. पत्रोती यांनी सूक्ष्म तृणधान्य राळा, नाचणी, भगर, वरी, बाजरी, ज्वारी इत्यादी पारंपरिक पिकांचे महत्त्व आणि लागवडीखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. ओडीएसएफ शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अमोल रणदिवे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॅा. तांबडे यांनी केले. समाधान जवळगे यांनी सूत्रसंचालन केले. सौ. अनिता सराटे यांनी आभार मानले.  नाबार्डच्या योजना फायदेशीर  नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक शेळके यांनी नाबार्डच्या विविध योजनांची माहिती दिली. श्री. शेळके म्हणाले, शेतकऱ्यांसाठी विविध ठिकाणच्या भेटी, अँग्री क्लिनिक ऍण्ड ऍग्री बिझनेसचा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम, कृषी मालावरील प्रक्रियेसाठी कर्जपुरवठा इत्यादी योजना नाबार्डकडे आहेत. शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन शेतीला हातभार लावावा, असे आवाहन केले. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.