जळगावमधील १७५ गावांमध्ये पाणी योजना मंजूर 

जळगाव : जिल्ह्यातील १७५ गावांचा पाणीप्रश्‍न कायमचा मिटणार आहे. या सर्व गावांमध्ये जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनांना मंजुरी प्रदान करण्यात आली असून, यासाठी तब्बल ११२ कोटी ५७ लख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
जळगावमधील १७५ गावांमध्ये पाणी योजना मंजूर 
Water schemes approved in 175 villages in Jalgaon

जळगाव : जिल्ह्यातील १७५ गावांचा पाणीप्रश्‍न कायमचा मिटणार आहे. या सर्व गावांमध्ये जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनांना मंजुरी प्रदान करण्यात आली असून, यासाठी तब्बल ११२ कोटी ५७ लख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यातील ९० गावांच्या पाणीपुरवठा योजनेच्या प्रशासकीय मान्यतेसह निविदा निघाल्या असून, उर्वरित गावांच्या निविदा आठ ते दहा दिवसांमध्ये निघणार आहेत. या माध्यमातून या सर्व गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न कायमचा निकाली निघणार आहे. 

आधीच्या पाणीपुरवठा योजनांमधील सर्व त्रुटी दूर करून शासनाने जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येकाला घरपोच पाणी देण्याचे नियोजन केले आहे. याअंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेत जिल्ह्यातील ७३१ गावांसाठी तब्बल ९४७ कोटी रुपयांचा कृतिआराखडा तयार करण्यात आला आहे. आधीच्या योजना या दरडोई ४० लिटर पाण्याच्या निकषावर आखण्यात आल्या होत्या. तर जलजीवन मिशन ही ५५ लिटर दरडोई या निकषावर अमलात आली आहे. आतापर्यंत १७५ गावांच्या योजनांना तांत्रिक मान्यतेसह मंजुरीचे आदेश मिळाले आहेत. यामध्ये ८५ गावांच्या योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्या निविदा प्रक्रियेत आहेत. तर उर्वरित ९० गावांच्या योजनांची निविदा प्रक्रिया येत्या आठ ते दहा दिवसांत पूर्ण होणार आहे. या सर्व पाणीपुरवठा योजनांसाठी ११२ कोटी ५७ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

योजना मंजुरीची तालुकानिहाय संख्या  जलजीवन मिशन योजनेअंतर्गत अमळनेर- २८, भडगाव- चार, भुसावळ- पाच, चाळीसगाव- २०, बोदवड- एक, धरणगाव- दहा, एरंडोल- नऊ, जळगाव- २०, जामनेर- दहा, मुक्ताईनगर- आठ, रावेर- सहा, पारोळा- १८, पाचोरा- आठ, यावल- नऊ अशा एकूण १७५ गावांच्या योजनांना मंजुरी मिळाल्याने येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची दूर होणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. पंकजकुमार आशिया, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता जी. एस. भोगवाडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस. सी. निकम आणि ए. बी. किरंगे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com