घाटणे बॅरेजमध्ये गेलेल्या जमीनीची फेरमोजणी होणार 

सोलापूर ः मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेत बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी पुन्हा बैठक घेऊ, तसेच घाटणे बॅरेजमध्ये गेलेल्या जमिनीची शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा मोजणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला.
घाटणे बॅरेजमध्ये गेलेल्या जमीनीची फेरमोजणी होणार 
Went to Ghatne Barrage Land reclamation will take place

सोलापूर ः मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेत बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी पुन्हा बैठक घेऊ, तसेच घाटणे बॅरेजमध्ये गेलेल्या जमिनीची शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा मोजणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला.  जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनात नुकतीच आष्टी उपसा सिंचन योजना आणि घाटणे बॅरेजमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील यांनी त्यासाठी पाठपुरावा करत ही बैठक घेण्यासाठी पुढाकार घेतला. उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड, उजनीचे ना.वा.जोशी, भूसंपादन विभागाचे अधिकारी व्ही.एल. गायकवाड, कृषी उपसंचालक आऱ.टी. मोरे यावेळी उपस्थित होते. आष्टी उपसा सिंचन योजनेतील कोन्हेरी, शेटफळ यासह इतर गावातील काही शेतकऱ्यांना जमीन संपादनाची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. त्यांना ही रक्कम मिळावी, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे मूल्यांकन करताना फळबाग झाडांना वगळण्यात आले आहे. त्यांनाही आता नव्याने समावेश करताना भरपाईमध्ये विचार केला जाणार आहे, असे सांगण्यात आले. ज्या शेतकऱ्यांना नदीच्या बाजूला जमीन असतानाही त्यांच्या जमिनीची नोंद कोरडवाहू म्हणून लागली. त्यांना कोरडवाहू म्हणून मोबदला मिळाला. पण आता त्या जमिनीला बागायती म्हणून मोबदला मिळणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य पाटील म्हणाले. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com