युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार व्हावे : भास्करराव पेरे 

नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च शिक्षित होऊन स्वत:चे व देशाचे उज्ज्वल भविष्य घडवावे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेती, वनराई आणि संस्कारांचे संगोपन कधीही विसरू नये. युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार व्हावे,’’ असे प्रतिपादन आदर्श गाव पाटोदा येथील माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी पिंपळगाव येथे केले.
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार व्हावे : भास्करराव पेरे 
Youth should be the cornerstone of rural development: Bhaskarrao Pere

  नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च शिक्षित होऊन स्वत:चे व देशाचे उज्ज्वल भविष्य घडवावे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेती, वनराई आणि संस्कारांचे संगोपन कधीही विसरू नये. युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार व्हावे,’’ असे प्रतिपादन आदर्श गाव पाटोदा येथील माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी पिंपळगाव येथे केले.           मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात आयोजित ‘ग्रामविकासात युवकांची भूमिका’ या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते होते. या वेळी व्यासपीठावर स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्‍वासराव मोरे, उल्हासराव मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, सरपंच दत्तोपंत डुकरे, माधवराव ढोमसे आदी मान्यवर उपस्थित होते. पेरे पुढे म्हणाले, की गावाच्या विकासात स्वच्छ पाणी, फळझाडांची लागवड, शिक्षण, महिलांचा सन्मान, निराधार वृद्धांचा सांभाळ आणि ग्राम स्वच्छतेला विशेष महत्त्व देणे गरजेचे आहे.  या वेळी महाविद्यालयात ‘प्लॅस्टिक इन प्लॅस्टिक’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांचे हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.  प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी केले. अध्यक्षीय समारोप करताना मविप्र सभापती माणिकराव बोरस्ते यांनी आजच्या तरुण युवकांनी भास्करराव पेरे यांचा आदर्श घेऊन गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहावे व आपली भूमिका बजावावी, असे आवाहन केले.  सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा. ज्ञानोबा ढगे यांनी, तर प्रा. अल्ताफ देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य, पंचक्रोशीतील सरपंच आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com