वनस्पतीतील रोगांची महामारी रोखण्यासाठी नव्या साधनांची आवश्यकता

पिकांमधील रोगांच्या उद्रेकांचे स्रोत नेमके व वेळीच जाणणे आवश्यक आहे. त्याचे रूपांतर तीव्र उद्रेक किंवा महामारीमध्ये होण्याआधीच त्याचा प्रसार रोखला पाहिजे. कारण एकदा का त्याचे रूपांतर महामारीमध्ये झाले की रोगाला रोखणे अवघड होते.
Rust (UG 99) disease in wheat crop is under global survey
Rust (UG 99) disease in wheat crop is under global survey

पिकांमधील रोगांच्या उद्रेकांचे स्रोत नेमके व वेळीच जाणणे आवश्यक आहे. त्याचे रूपांतर तीव्र उद्रेक किंवा महामारीमध्ये होण्याआधीच त्याचा प्रसार रोखला पाहिजे. कारण एकदा का त्याचे रूपांतर महामारीमध्ये झाले की रोगाला रोखणे अवघड होते. कोणत्याही रोगांच्या प्रसाराला देश किंवा अन्य सीमा घालता येत नाहीत. दोन प्रदेशांदरम्यान असलेल्या लक्षावधी मैलांचे समुद्रही त्यांचा प्रसार अडवू शकत नाही. अशा वेळी वनस्पती किंवा पिकांमध्ये येणाऱ्या हानिकारक रोगांना अटकाव करायचा असेल, तर तो केवळ सातत्यपूर्ण निरीक्षणे, सर्वेक्षणे आणि तत्काळ निदानातून होऊ शकतो. त्याच प्रमाणे एखाद्या रोगाचे आगमन होण्याचे पूर्व अंदाज बांधणे शक्य होईल. ही आवश्यकता ‘प्रोसिडिंग्ज ऑफ दी नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’ मध्ये प्रकाशित लेखांमध्ये संशोधकांनी मांडली आहे. सध्या कोविड १९ च्या प्रसारामुळे संपूर्ण मानव जात आधीच धोक्यात आली आहे. त्यातच एखाद्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे प्रमुख पिकांच्या उत्पादनामध्ये लक्षणीय घट झाल्यास जागतिक पातळीवरील अन्नसुरक्षेचे प्रश्‍न उभे राहू शकतात. त्याविषयी माहिती देताना उत्तर कॅरोलिना राज्य विद्यापीठातील वनस्पती विकृतिशास्त्राचे प्रा. जीन रिस्टॅनो, विल्यम नील रेनॉल्ड्स यांनी सांगितले, की पिकांमधील रोगांच्या उद्रेकांचे स्रोत नेमके व वेळीच जाणणे आवश्यक आहे. त्याचे रूपांतर तीव्र उद्रेक किंवा महामारीमध्ये होण्याआधीच त्याचा प्रसार रोखला पाहिजे. कारण एकदा का त्याचे रूपांतर महामारीमध्ये झाले की रोगाला रोखणे अवघड होते. रिस्टॅनो यांनी पुढे सांगितले, की जागतिक पातळीवर पूर्वीपासून काही रोग सर्वेक्षणाखाली आहेत. त्यात गव्हावरील तांबेरा आणि बटाट्यावरील उशिरा येणारा करपा यांचा समावेश होता. या रोगामुळे आयर्लंडमध्ये बटाट्याचा दुष्काळ पडला होता. मात्र अन्य अनेक हानिकारक रोग हे सर्वेक्षणाखाली नाहीत. सध्या रोगांवर पाळत ठेवण्यासाठी काही यंत्रणा कार्यरत आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन व्यापक काम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी इलेक्ट्रॉनिक सेन्सरचा वापर करून रोगांची ओळख पटवण्याचे आणि त्यांचा प्रसार रोखण्याचे काम प्रभावीपणे करता येईल. वनस्पतीमधील रोगांची महामारी रोखण्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. यामुळे अधिक प्रभावीपणे वनस्पतीमधील रोगांचा प्रसार रोखणे शक्य होईल. उत्तर कॅरोलिना येथील पीक शास्त्र सुधारांसाठी पुढाकार घेणारा एक गट (GRIP४PSI) यासाठी निधी गोळा करण्याचे काम करत आहे. या संशोधनातून संभाव्य रोगांचे आगमन, प्रसाराबाबत पुरेशा वेळेआधीच माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचा फायदा उद्रेक व संभाव्य महामारी रोखण्यासाठी आवश्यक ती रणनीती आखण्यासाठी होऊ शकतो. जागतिक पातळीवर वनस्पतीमध्ये रोगांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे जागतिक अन्न पुरवठ्यास धोका निर्माण होत आहे. २०१९ मध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, गहू, तांदूळ आणि मका यासारख्या प्रमुख पिकांचे कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे सुमारे २१ ते ३० टक्के नुकसान झाले होते. याचे दुसरे उदाहरण म्हणजे, अमेरिकेमध्ये निर्यातीसाठी कॅव्हेन्डिश या जातीच्या केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कॅव्हेंडिश केळीजाती या फ्युजारीअम ओडोरॅटीस्सिमम (Fusarium odoratissimum) या पनामा रोगासाठी कारणीभूत, त्यातही ‘ट्रॉपिकल रेस ४’ या प्रजातीसाठी अतिसंवेदनशील ठरत आहेत. या रोगाचा प्रसार आशियामधून आफ्रिका, मध्यपूर्व आणि सध्या दक्षिण अमेरिकेमध्ये वेगाने होताना दिसत आहे. हवामान बदलामुळे कीड-रोगांचा उद्रेक अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याचे रिस्टॅनो यांनी म्हटले आहे. याचे उदाहरण म्हणजे, सहारण आफ्रिकेमधील हवामान बदल आणि दुष्काळाचा टोळांच्या संख्येवर व प्रसाराच्या व्याप्तीवर परिणाम दिसून आला. या टोळधाडीने दक्षिण उप-सहारा आफ्रिकेतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हवामानविषयक माहितीद्वारे कीड किंवा रोगाच्या प्रसाराचा अंदाज बांधता येईल. जास्त प्रमाणात पाऊस पडल्यास हवेद्वारे रोगकारक जिवाणूंचा प्रसार होऊ शकतो. तसेच चक्रीवादळाद्वारे बुरशीजन्य बिजाणूंचा फैलाव होऊ शकतो. चक्रीवादळामुळे सोयाबीनमधील तांबेरा रोगाचा प्रसार उत्तर अमेरिकेमधून दक्षिण अमेरिकेमध्ये झाल्याचे पाहायला मिळते. एकत्रित अभ्यासाची गरज  आधीच वाढत्या लोकसंख्येमुळे जागतिक अन्नपुरवठा साखळीवर ताण येत आहे. त्यात पिकांमधील रोगांमुळे आणखी भर पडत आहे. जागतिक पातळीवर मानवी आणि पिकांच्या आरोग्यावर एकत्रित अभ्यास करण्याची गरज आहे.

 • सातत्याने होणाऱ्या पावसामुळे हवेमध्ये निर्माण होणाऱ्या वनस्पती रोगकारक सूक्ष्मजीवांचा प्रसार होऊ शकतो.
 • वादळामुळे बुरशी बिजाणू वेगाने वाहून नेले जातात. अशाच प्रकारे सोयाबीनवरील तांबेरा रोग हा दक्षिण अमेरिकेतून उत्तर अमेरिकेतून आला आहे.
 • अलीकडे रोगाचा प्रसार उष्ण होत चाललेल्या वसंतामुळे वाढीच्या टप्प्यामध्ये लवकर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
 • जागतिक पातळीवर होत असलेल्या अन्नधान्याच्या व्यापाराच्या स्वरूपामुळेही काही वनस्पती रोगांचा प्रसार होतो. नव्या प्रदेशामध्ये नव्या रोगांमुळे अधिक उद्रेक होऊ शकतो.
 • मानवाची अन्न सुरक्षा आणि उपजीविका शेतीशी निगडित असून, आपल्या आहारासोबतच आपले आरोग्य जोडलेले आहे, असे रिस्टॅनो यांनी सांगितले.
 • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com