पेनटाकळी प्रकल्पबाधित गावांना तातडीने भूखंड वाटप करावे : पालकमंत्री डॉ. शिंगणे

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आलेला पेनटाकळी प्रकल्पाचा भूखंड विषय प्रशासनाने गांभीर्याने घेतला आहे. पेनटाकळीच्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्या घानमोड, मानमोड व पांढरदेव गावाच्या पुनर्वसनाची कार्यवाही यंत्रणांनी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
पेनटाकळी प्रकल्पबाधित गावांना  तातडीने भूखंड वाटप करावे : पालकमंत्री डॉ. शिंगणे
Pentakali project affected villages Plots should be allotted immediately

बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आलेला पेनटाकळी प्रकल्पाचा भूखंड विषय प्रशासनाने गांभीर्याने घेतला आहे. पेनटाकळीच्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्या घानमोड, मानमोड व पांढरदेव गावाच्या पुनर्वसनाची कार्यवाही यंत्रणांनी करावी. तसेच घानमोड व मानमोड येथील पुनर्वसित गावांच्या जागेवरील भूखंडांचे तातडीने वाटप करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत.  जिल्ह्यातील घानमोड, मानमोड व पांढरदेव येथील पुनर्वसन आणि तेल्हारा येथील नागरी सुविधांबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या भागाच्या आमदार श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्री. माचेवाड, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सुनील चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते.  डॉ. शिंगणे पुढे म्हणाले, ‘‘घानमोड व मानमोड येथील भूखंडावर अतिक्रमण आहे, त्याच स्थितीत त्याच जागेवर भूखंड देऊन पुनर्वसन करण्यात यावे. याबाबत निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करावा. त्याचप्रमाणे पांढरदेव येथील भूखंडांचे सीमांकन करून घ्यावे. सीमांकन झाल्यानंतर विनाविलंब भूखंडाचे वाटप करावे. यामध्ये दिरंगाई करू नये. निधी, भूखंड वाटप व नागरी सुविधांच्या कामांचा कालबद्ध कार्यक्रम आखावा. या कार्यक्रमाचे वेळापत्रकच उपोषणकर्त्यांना देऊन उपोषणकर्त्यांचे समाधान करावे. तसेच काही भूखंडांवर घरे असल्यास व ती पडलेली असल्यास त्या घरांचे जुन्याच मुल्यांकनानुसार मूल्यांकन करावे.  भूसंपादनप्रकरणे निधीअभावी व्यपगत झाली आहेत. या प्रकरणांमध्ये तातडीने निधी मागणी प्रस्ताव संबंधित यंत्रणेने वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करून निधी उपलब्ध करून घ्यावा. तसेच पारंपरिक पद्धतीने भूसंपादन करण्यापेक्षा सरळ खरेदी पद्धत अवंलबवावी. यामुळे गतीने भूसंपादन होऊन मोबदलाही तातडीने देणे शक्य होईल. तेल्हारा या गावाने स्वेच्छा पुनर्वसन केले आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. या गावाने शासनाचा मोठा निधी वाचविला आहे. त्यामुळे तेल्हारा येथील भूखंड मालकांची नावे नमुना ८ वर चढवावी. त्यासाठी लाभार्थीनुसार भूखंड वाटप करून हा प्रश्न सोडवावा. तसेच गावातील नागरी सुविधांची कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. जिल्हा परिषदेच्या मासरूळ व अमडापूर गटातील प्रलंबित, नवीन प्रस्तावित कामे पूर्ण करावी. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजना, जनसुविधा अंतर्गत निधीची तरतूद करावी. पांदण रस्ते, जामठी येथील शाळा खोल्यांचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे. अमडापूर गटातील स्मशान भूमी सौंदर्यीकरण, पाझर तलाव दुरुस्ती करावी, असेही डॉ. शिंगणे म्हणाले. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.