वंध्यत्व निवारण शिबिरातून दूध उत्पादनाला चालना

विदर्भ व मराठवाडा दूध विकास प्रकल्पाअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नियोजनबद्ध पद्धतीने वंध्यत्व निवारण शिबिराच्या आयोजनातून येत्या वर्षात दुधाचे उत्पादन दुप्पट होईल.
वंध्यत्व निवारण शिबिरातून दूध उत्पादनाला चालना

नागपूर : ‘‘विदर्भ व मराठवाडा दूध विकास प्रकल्पाअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नियोजनबद्ध पद्धतीने वंध्यत्व निवारण शिबिराच्या आयोजनातून येत्या वर्षात दुधाचे उत्पादन दुप्पट होईल,’’ असा विश्वास महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे (माफसू)कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांनी व्यक्त केला.  विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, पशुसंवर्धन खाते व मदर डेअरी यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘‘दुधाळ जनावरातील वंध्यत्व व्यवस्थापन’’ या विषयावरील आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक प्रा. डॉ. अनिल भिकाने, अधिष्ठाता निम्नशिक्षण डॉ. सुनील सहातपुरे, विभागीय सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ.बलदेव रामटेके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. अे. पी. सोमकुवर व प्रकल्प संचालक डॉ. सतीश राजू उपस्थित होते.  प्रास्तविक भाषणात डॉ. राजू यांनी दुग्ध विकास प्रकल्पाअंतर्गत डिसेंबर २०२२ पर्यंत विदर्भ व मराठवाडा दूध विकास प्रकल्पाअंतर्गत ११ जिल्ह्यांत दर महिन्याला तीन शिबिरे याप्रमाणे ३६० वंध्यत्व निवारण शिबिरे घेण्याचे नियोजन केल्याचे सांगितले. यामध्ये विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला व यवतमाळ या सात जिल्ह्यांत तर मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड व जालना अशा एकूण ११ जिल्ह्यात शिबिर घेतले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यांत प्रत्येक शिबिरात वंध्यत्वग्रस्त किमान ५० निवडक व एकूण १८ हजार जनावरांवर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर, अकोला, परभणी व उदगीर येथील पशू प्रजनन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन खात्याच्या अधिकाऱ्याच्या मदतीने उपचार केले जाणार आहेत.  या प्रसंगी प्रा. डॉ. भिकाने म्हणाले, की वध्यंत्वामुळे प्रजोत्पादन क्षमता कमी होत असल्याने एकूण दूध उत्पादन घटण्याबरोबर वासरे मिळण्याचे प्रमाण घटते व एकंदरीत दूध उत्पादनावरील खर्च वाढतो म्हणून दूध व्यवसाय शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी वंध्यत्व निवारण आवश्यक आहे.  दिवसभर चाललेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. मनोज पाटील डॉ. राजेश शर्मा, डॉ. दिलीपसिंह रघुवंशी, डॉ. अजय गावंडे यांनी सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात कोविडच्या नियमांचे पालन करून नागपूर, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त व पशुधन विकास अधिकारी यांनी सहभाग घेतला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजय गांवडे तर आभार कार्यक्रम समन्वयक तथा विभाग प्रमुख डॉ. दिलीपसिंह रघुवंशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी मोहनसिंह गौतम, मोहन कापसे यांनी पुढाकार घेतला.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.