शेतकरी मुंग्यांनी केले अन्नद्रव्य शोषणासाठी वनस्पतींमध्ये बदल

शेतकरी मुंग्यांनी केले अन्नद्रव्य शोषणासाठी वनस्पतींमध्ये बदल
शेतकरी मुंग्यांनी केले अन्नद्रव्य शोषणासाठी वनस्पतींमध्ये बदल

लक्षावधी वर्षांपासून शेती करणाऱ्या मुंग्यांमुळे वनस्पतींच्या शरीरशास्त्रामध्ये त्यानुसार बदल घडले असल्याचे संशोधन ऑक्स्फर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केले आहे. या मुंग्यांनी नत्राने भरपूर असलेल्या विष्ठा सरळ वनस्पतींच्या आतमध्ये ठेवल्याने वनस्पतींमध्ये ते नत्र शोषण्याच्या दृष्टीने संरचना उत्क्रांत होण्यास मदत झाली आहे. हे संशोधन ‘न्यू फायटोलॉजिस्ट’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. मानवाने शेती करण्यास केवळ १२ हजार वर्षांपूर्वी सुरवात केली. मात्र, मुंग्या लक्षावधी वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. पाने कुरतडणाऱ्या मुंग्या या उत्तम शेतकरी मानल्या जातात. गेल्या ५० दशलक्ष वर्षांपासून या मुंग्या पानांवर बुरशीची वाढ करत आहेत. तर फिजी बेटावरील मुंग्या फुले येणाऱ्या वनस्पतींची शेती सुमारे ३ दशलक्ष वर्षांपासून करत आहेत. ऑक्स्फर्ड विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागातील संशोधक डॉ. गुइल्लाउमे चोमिस्की यांनी लक्षावधी वर्षांपासून शेती करत असलेल्या या मुंग्यांनी वनस्पतीच्या शरीरशास्त्रामध्ये काही बदल घडवले असल्याचे प्रतिपादन केले आहे. या मुंग्या नत्राने भरपूर असलेली विष्ठा वनस्पतींच्या आतमध्ये ठेवतात, त्यामुळे वनस्पतीमध्ये त्या शोषणयोग्य संरचना उत्क्रांत झाल्या आहेत. डॉ. चोमिस्की म्हणाले, की वनस्पतीच्या वाढीवर मर्यादा आणणारा घटक म्हणजे नत्राचे शोषण करण्याची त्यांची क्षमता होय. अनेक वनस्पती (त्यात आपली पिकेही समाविष्ट) मुळांद्वारे जमिनीतून नैसर्गिकरीत्या नत्राचे शोषण करत असतात. मात्र, नैसर्गिकरीत्या मुळांना नत्राच्या अधिक तीव्रतेचा सामना करावा लागत नाही. मात्र, लक्षावधी वर्षांपूर्वीपासून मुंग्यांनी अधिक नत्र असलेली विष्ठा वनस्पतींमध्ये ठेवली. त्याचे शोषण करण्याची संरचनाही वनस्पतीमध्ये उत्क्रांत झाली. ही संरचना कशी उत्क्रांत झाली, याचा जनुकीय आढावा घेण्याचे काम सुरू आहे. याचा उपयोग पिकांच्या अधिक नत्रशोषक संरचना विकसनासाठी करणे शक्य होईल. अन्ननिर्मितीबरोबरच घराचीही निर्मिती ः

 • मुंग्यांची ही वैशिष्ट्यपूर्ण शेती असून, त्यामध्ये केवळ अन्ननिर्मितीच नाही, तर घरही बांधतात. वनस्पती पोकळ्या तयार करतात, त्यामध्ये मुंग्या आपले घर करतात. हे संबंध दोघांसाठी आवश्यक ठरतात. कारण अन्य उष्ण कटिबंधीय झाडावर मुंग्यांमध्ये असलेली घर बनवण्याची क्षमता या मुंग्यांनी हरवली आहे. तसेच आपल्याकडे याला बांडगूळ म्हणतात, तर शास्त्रीय भाषेत एपीफाईट्स म्हणून ओळखल्या झाडावर वाढणाऱ्या वनस्पतीही मुंग्यांद्वारे पुरवल्या जाणाऱ्या अन्नद्रव्ये आणि संरक्षणावर अवलंबून असतात.
 • याची चाचणी करण्यासाठी चोमिस्की यांनी फिजी बेटावरील वनस्पतींमध्ये मुंग्यांनी ठेवलेल्या अन्नद्रव्यांचा पाठपुरावा केला. अशा वनस्पती प्रजातींमध्ये ठेवलेल्या विष्ठेमुळे अंतर्गत भागापर्यंत अन्नद्रव्ये शोषणाची भित्तिका तयार होतात. या वनस्पतींच्या जवळच्या पण मुंग्यांद्वारे न वाढवलेल्या प्रजातीही फिजी येथील वर्षावनामध्ये आहेत. त्यांच्यावर या शेती करणाऱ्या मुंग्यांनी वसाहत केलेली दिसत नाही.
 • या मुंग्यांनी त्यांच्या पिकाला अन्नद्रव्ये पुरवलेली आहेत. त्यांनी केवळ अन्नद्रव्यांमध्ये सुधारणा केल्या नाहीत, तर आपल्या भागीदारामध्ये उत्क्रांती दर्शक बदल घडवले आहेत. म्युनिच विद्यापीठातील प्रो. सुझान रेन्नर म्हणाले, की मुंग्यांद्वारे स्थानिकीकरण झालेल्या वनस्पतीमध्ये मुंग्यांनी तयार केलेल्या नत्रयुक्त घटकांचे शोषण दुपटीपेक्षा अधिक होते. या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा अन्नद्रव्य पुनर्चक्रीकरणामुळे मातीरहित स्थितीमध्येही या वनस्पती झाडांवर वाढू शकतात.
 • सध्या मानव संगणक व ड्रोनद्वारे शेतामध्ये नियंत्रणाच्या अनेक उपाययोजना राबवत असतो. मानवाच्या आधी कित्येक लक्ष वर्षे आधीपासून शेती करणाऱ्या मुंग्यांनी आपल्या शेतीमध्ये अत्यंत काटेकोरपणा आहे. त्यांनी विष्ठेतील उपयुक्त अन्नद्रव्ये वेगळी करण्यासोबतच वनस्पतींमध्ये त्याच्या कार्यक्षम शोषणाची व्यवस्था तयार करण्यात आघाडी घेतली आहे.
 • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com