दुपारची झोप मुलांना करते अधिक आनंदी

दुपारची झोप मुलांना करते अधिक आनंदी
दुपारची झोप मुलांना करते अधिक आनंदी

जी शाळकरी मुले आठवड्यातून किमान तीन वेळा दुपारी ३० ते ६० मिनिटांची झोप घेतात, ती अधिक आनंदी राहतात. अशी मुले अधिक स्वनियंत्रित राहण्यासोबत वर्तनविषयक समस्यांपासून दूर राहत असल्याचे संशोधनात आढळले आहे. या मुलांचा बुद्ध्यंकही चांगला राहून शिक्षणामध्ये चांगली प्रगती करतात. या संशोधनाचे निष्कर्ष जरनल स्लीपमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. मुलांच्या आरोग्यासाठी दुपारची अर्धा ते एक तासाची झोप आवश्यक आहे. त्यामुळे मुलांचे बदलते मूज, ऊर्जा पातळी आणि शाळेतील चांगल्या प्रगती साध्य होत असल्याचे सर्वसामान्य पालकांचेही मत असते. त्या मताला पेनसिल्व्हानिया विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेल्या संशोधनाचे पाठबळ मिळाले आहे. पेनसिल्वानिया विद्यापीठातील संशोधक अॅड्रियन रैने यांनी चौथी, पाचवी आणि सहावीच्या १० ते १२ वयोगटातील सुमारे ३ हजार मुलांचा अभ्यास केला. त्यांनी सांगितले, की जी मुले आठवड्यातून किमान ३ व त्यापेक्षा अधिक वेळा अर्धा ते एक तासाची झोप घेतात, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये ७.६ टक्क्यांनी वाढ होते आणि हे कोणत्या पालकांना नको आहे? झोपेची कमतरता आणि दिवसभरातील आळसाचे प्रमाण आश्चर्यकारकरीत्या वाढलेले आहे. त्याचा परिणाम सुमारे २० टक्के मुलांमध्ये दिसून येतो. त्याचे विपरीत परिणाम नकारात्मकता, भावनिक आणि भौतिक पातळीवर दिसून येत असल्याचे जियांगझोंग लियू यांनी सांगितले. यापूर्वी असे अभ्यास हे प्रामुख्याने शाळा सुरू होण्याआधी आणि लहान मुलांवर करण्यात आले आहेत. असा झाला अभ्यास

 • अमेरिकेत मूल जसजसे मोठे होत जाते, तशी त्याची दुपारची झोप बंद होते. चीनमध्ये ही सवय त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये रुळली असून, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेबरोबर प्रौढ होईपर्यंत टिकते. लियू आणि रैने यांनी रुई फेंग या जैवसंख्याशास्त्रज्ञ आणि सारा मेडनिक अशा सहकाऱ्यांसोबत एक अभ्यास केला. २००४ मध्ये केलेल्या अभ्यासामध्ये २९२८ मुलांचा समावेश होता. या मुलांची दुपारी झोपण्याच्या वेळा, वारंवारता आणि कालावधी यांची माहिती गोळा करण्यात आली. चौथी ते सहावी या काळामध्ये मुलांच्या नकारात्मकता, आनंदीपणा, नवे शिकण्याची वृत्ती याबरोबरच शरीर वस्तुमान निर्देशांक, ग्लुकोज पातळी अशा मानसिक व शारीरिक स्वास्थ्यांच्या निकषावर मापन केले. सोबतच त्यांच्या शालेय प्रगतीचा आढावा घेतला.
 • मेडनिक यांनी सांगितले, की दुपारची झोप किंवा वामकुक्षीमुळे मेंदूच्या कार्याला अधिक वेळ मिळतो. दुपारी थोडी झोप घेणाऱ्या मुलांना त्याचा मानसिक आणि शारीरिक पातळीवर फायदा होतो. सोबत त्यांची शालेय प्रगतीतही भर पडते.
 • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com