कॅनडातील पहिला व्हर्टिकल मशरूम फार्म

कॅनडातील पहिला व्हर्टिकल मशरूम फार्म
Canada's first vertical mushroom farm

कॅनडातील अल्बेर्टा येथील ग्रुजर फॅमिली फंजाय या नावाने पहिला व्हर्टिकल मशरूम फार्म उभारण्यात आला आहे. कार्लटन आणि रॅचेल ग्रुजर या दांपत्याने इनडोअर पद्धतीने आगळ्या अळिंबीच्या उत्पादनाला सुरवात केली आहे. या फार्ममध्ये नेहमीच्या व्यावसायिक पद्धतीने उत्पादित केल्या जाणाऱ्या अळिंबींचा समावेश मुद्दाम केलेला नाही. येथे संपूर्णपणे झाडांवर वाढणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आणि खाद्य अळिंबीची निर्मिती करण्यात येत आहे. अळिंबी उत्पादन सुरू केल्यानंतर फक्त तीन वर्षांमध्येच ग्रुजर यांनी उत्पादनामध्ये सातत्य मिळवले आहे. त्यांच्या फार्ममधून आता दरमहा १२ हजार पौंड वजनांचा कंटेनर विक्रीसाठी बाहेर पडत आहे. यात १० प्रकारच्या अळिंबी असून, त्यातील अनेक अळिंबी या औषधी मानल्या जातात. ग्राहकांमध्ये नेहमीच्या अळिंबीपेक्षाही अधिक पोषक, औषधी आणि झाडांवर वाढणाऱ्या अळिंबीविषयी उत्सुकता दिसून येत असल्याचे रॅचेल ग्रुजर यांनी सांगितले. त्या आपले पती कार्लटन ग्रुजर यांच्यासह हा फार्म चालवतात. त्या फार्मविषयी माहिती देताना सांगितले, की आम्ही अळिंबीच्या वाढीसाठी कृत्रिम झाडांची निर्मिती केली आहे. ज्या अळिंबी सेंद्रिय पदार्थांवर वाढतात, त्यांच्यासाठी विशिष्ठ प्रकारच्या पिशव्यांमध्ये निर्जंतुकीकरण केलेले सेंद्रिय पदार्थ भरले जातात. त्यावर त्यांची वाढ केली जाते. यातील प्रत्येक अळिंबीचे खास असे वैशिष्‍ट्य आहे. उदा. एका अळिंबीस खास अशा धुरकट गंध आहे. ग्रील केलेल्या भाज्यांप्रमाणे त्याची चव लागते. सध्या केवळ ताज्या स्वरूपातील विक्रीवर भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com