खत अनुदान फरक पोचला २३ हजार कोटींवर

खत अनुदान फरक पोचला २३ हजार कोटींवर
खत अनुदान फरक पोचला २३ हजार कोटींवर

डिसेंबर २०१८ अखेर शासकीय खत अनुदानातील फरकाची रक्कम २३,२८४ कोटी रु. पर्यंत पोचली असल्याची माहिती शासनाच्या वतीने राज्यसभेमध्ये दिली. त्यातील काही रक्कम उपलब्ध निधीतून देण्यात येणार असून, उर्वरित रक्कम निधी मिळाल्यानंतर देण्यात येईल. खत राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंग यांनी वरिष्ठांच्या सभागृहामध्ये दिलेल्या लिखित उत्तरांनुसार, खतांच्या अनुदानाची रक्क्म खत कंपन्यांना उपलब्ध होणाऱ्या निधीनुसार नियमितपणे दिली जाईल. डिसेंबर २०१८ पर्यंत सुमारे २३,२८३.६६ कोटी रुपये इतके खत अनुदान प्रलंबित आहे. त्यातील स्थानिक युरियावरील अनुदान रु.११,२९३ कोटी आणि आयात केलेल्या युरियावरील अनुदान रु. २,३४१.१६ कोटी इतको आहे. आयात स्फुरदयुक्त व पालाशयुक्त खतांवरील अनुदान रु. ५,९६३ कोटी आहे. ही फरकाची रक्कम चालू आर्थिक वर्षामध्ये शिल्लक उपलब्ध निधीतून व उपलब्धतेनुसार देण्यात येईल. सरकारकडे डिसेंबर अखेर रु. १३,०५६ कोटी इतका निधी शिल्लक असून, एकूण खर्च रु. ६०,३८३ कोटी इतका आहे. चालू अर्थसंकल्पीय अंदाजानुसार खत अनुदान रु. ७३,४३९.८५ कोटी इतके अपेक्षित आहे. सध्याची नवी खते प्रमाणित करण्याची पद्धती वेळखाऊ असण्याबाबत आलेल्या अन्य एका प्रश्नाच्या अनुषंगाने मंत्रिमहोदयांनी नकारात्मक उत्तर दिले. प्रमाणीकरणाची व नवी खते खत नियंत्रण यादीमध्ये (एफसीओ) समाविष्ठ करण्याची पद्धत सरकारने सोपी असल्याचे त्यांनी सांगितले. १९८५ च्या एफसीओ नियंत्रण कायद्यानुसार मध्यवर्ती खत समिती निर्माण केली असून, तिच्या शिफारसीप्रमाणे खते यादीत घेतली जातात. ही समिती संसदीय समितीच्या शिफारशीप्रमाणे तयार केली आहे. खतांचा दर्जा तपासण्याची सध्याची पद्धतींचे विश्लेषण करून त्याचा अहवाल सभागृहापुढे लवकरच ठेवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com