कृषी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पुणे विभाग अव्वल

कृषी विभागाच्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत पुणे विभाग अव्वल ठरला
कृषी विभागाच्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत पुणे विभाग अव्वल ठरला

पुणे  ः कृषी विभागाच्या वतीने चौथ्या वार्षिक कृषी राज्यस्तरीय तरंग कला व क्रीडा महोत्सवाचे शुक्रवार (ता.२१) ते रविवार(ता.२३) दरम्यान कोपरगावमधील (जि. नगर) कोकमठाण येथील आत्मा मालिका शैक्षणिक व क्रीडा संकुलामध्ये आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कला, क्रीडा व संचलन स्पर्धेत सर्वाधिक ८१ गुण मिळवून पुणे जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद मिळवले आहे. सोलापूर जिल्ह्याने या स्पर्धेत ५५ गुण मिळवून दुसरा क्रमांक, तर नगर जिल्ह्याने ५४ गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे. राज्यात पुणे विभाग अव्वल ठरला आहे.

कृषी विभागाच्या कला व क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (ता.२१) पद्मश्री राहीबाई पोपेरे व कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले होते. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत क्रिकेट, हॉलिबॉल, खो-खो, कबड्डी, गोळा फेक, धावणे, लांब उडी, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. शुक्रवारी व शनिवारी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धेत कृषी आयुक्तालय, कोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर या आठही विभागातील सुमारे दोन हजार खेळाडू सहभागी झाले होते.

या स्पर्धेत ठाणे विभागातील पालघर जिल्ह्याने ४३ गुण मिळवून चौथा क्रमांक, अमरावती जिल्ह्याने ४१ गुण मिळवून पाचवा, ठाणे जिल्ह्याने ३६ गुण मिळवून सहावा, रायगड जिल्ह्याने ३५ गुण मिळवून सातवा क्रमांक पटकवला. स्पर्धेतील विजेत्यांना विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, कृषी उपसंचालक दादाराम सप्रे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक व सुवर्ण, कांस्य पदके देऊन सम्मानित करण्यात आले. 

स्पर्धेत कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक विजयकुमार घावटे, पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, मृदा व जलसंधारण विभागाचे कृषी उपसंचालक दादाराम सप्रे, अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवडी, शिवाजी जगताप, नवनाथ कोळपकर, विलास नलगे, अशोक आढाव, मनोज सोनवणे, नवीनचंद्र बोराडे, अतुल पाटील आदी सहभागी झाले होते.

कृषी विभागाच्या राज्यस्तरीय कला, क्रीडा स्पर्धेतील पारितोषिक विजेते जिल्हे
क्रीडा प्रकार प्रथम  द्वितीय तृतीय
पुरुष कबड्डी कोल्हापूर अकोला सातारा
महिला कबड्डी पुणे  नगर सोलापूर
पुरुष खो-खो  सोलापूर सातारा कोल्हापूर
महिला खो-खो   पालघर  पुणे औरंगाबाद
पुरुष हॉलिबॉल सोलापूर नाशिक पुणे
पुरुष क्रिकेट पुणे सातारा  लातूर
महिला क्रिकेट पालघर ठाणे कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com