खतांच्या वाढलेल्या किमती पूर्ववत करा; कृषिमंत्री दादा भुसे यांचे केंद्राला पत्र

रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवड योग्य क्षेत्र वाढले आहे. वाढलेल्या लागवड क्षेत्रामुळे खतांची मागणीही वाढली आहे. मात्र, अनुदानित खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढविल्या आहेत. त्यामुळे महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडत नाही.
Fertilizer
Fertilizer

मुंबई - रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवड योग्य क्षेत्र वाढले आहे. वाढलेल्या लागवड क्षेत्रामुळे खतांची मागणीही (Demand Of Fertilizer) वाढली आहे. मात्र, अनुदानित खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढविल्या आहेत. त्यामुळे महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडत नाही. याबाबत राज्याचे कृषिंमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री (Union Minister Of Chemichal And Fertilizer ) मनसुख मांडविया (Mansukh Mandviya) यांना पत्र लिहिले असून खतांच्या वाढललेल्या किमती पूर्ववत करण्याची मागणी भुसे यांनी पत्राद्वारे केली आहे. 

''रब्बी हंगाम सध्या जोरात चालू आहे. अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रात लागवड योग्य क्षेत्र वाढल्याने खतांची मागणीही जास्त आहे. अलीकडे अनुदानित खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे एवढी महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यामुळे वाढीव दरामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे खतांच्या किमती पूर्ववत कराव्यात''. असे भुसे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

तसेच याप्रकरणी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून खतांच्या दरांचा (Fertilizer Rate) ताबडतोब आढावा घ्यावा आणि खतांच्या दरातील वाढ मागे घेण्यासाठी आवश्यक निर्देश जारी करावेत, अशी मागणीही भुसे यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.  

पत्रातील महत्त्वाचे मुद्दे - 

खत उत्पादकांनी राज्यात ०६ डिसेंबर, २०२१ रोजी घोषित केलेल्यादरांनुसार खतांची विक्री करावी. सुरळीत पुरवठा राखण्यासाठी आणि खतांच्या संतुलित वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक पावले केंद्र सरकारने उचलावीत आणि रब्बी हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

व्हिडीओ पाहा - 

राज्यात ०६ डिसेंबर, २०२१ रोजी घोषित केलेल्या दरांनुसार प्रति ५० किलो बॅगचा खतनिहाय दर आणि झालेली वाढ खालीलप्रमाणे -  (कंसात नमूद दर दिनांक १३ जानेवारी, २०२२ रोजीचे)

  १०:२६:२६- १४४० ते १४७० (१४४० ते १६४०). वाढ: १७० रुपये.

१२:३२:१६- १४५० ते १४९० (१४५० ते १६४०) वाढ: १५० रुपये.

१६:२०:०:१३ – १०७५ ते १२५० (११२५ ते १२५०) वाढ: ५० रुपये.

अमोनियम सल्फेट: ८७५ (१०००) वाढ: १२५.

१५:१५:१५:०९ – ११८० ते १४५० (१३७५ ते १४५०) वाढ: १९५ रुपये.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com