‘गोसीखुर्द’ प्रकल्प बाधितांचे  तत्काळ पुनर्वसन करा

गोसीखुर्द प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा पूर्ण करण्याचे नियोजन करावे. तसेच या प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रियेबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी नागपूर येथे दिले.
‘गोसीखुर्द’ प्रकल्प बाधितांचे  तत्काळ पुनर्वसन करा ‘Gosikhurd’ project affected Rehabilitate immediately
‘गोसीखुर्द’ प्रकल्प बाधितांचे  तत्काळ पुनर्वसन करा ‘Gosikhurd’ project affected Rehabilitate immediately

भंडारा: गोसीखुर्द प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा पूर्ण करण्याचे नियोजन करावे. तसेच या प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रियेबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी नागपूर येथे दिले.   विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभा कक्षात विभागीय आयुक्त लवंगारे-वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाच्या कामकाजाबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या.  गोसीखुर्द सिंचन प्रकल्प हा महाराष्ट्रातील एकमेव ‘राष्ट्रीय सिंचन प्रकल्प’ आहे. या प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करावीत. कुही तालुक्यातील सोनारवाही गावातील प्रकल्पग्रस्तांना आवश्यक त्या सर्व सुविधा व सहकार्य जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येईल. येथील ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत महसूल व जलसंपदा विभागाची संयुक्त बैठक लवकरच घेवून पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच गोसीखुर्द प्रकल्पासाठी शिल्लक भूसंपादनाचा जिल्हानिहाय आढावा घेऊन येत्या सहा महिन्यात भूसंपादनाची बहुसंख्य प्रकरणे मार्गी लावण्यात येतील, असा विश्वास  लवंगारे-वर्मा यावेळी व्यक्त केला.    सातशे गावांना होणार लाभ गोसीखुर्द प्रकल्पाची कामे पूर्ण झाले असून नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील १३ तालुक्यात ७१८ गावांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत ८५ गावठाणे बाधित आहेत. त्यांचे पुनर्वसन ६३ नवीन गावठाणात करण्यात येणार आहेत. त्यापैकी ६१ नवीन गावठाणासाठी  सुविधा निर्माण झाल्या असून दोन गावांची कामे प्रगतिपथावर आहेत. प्रकल्पातील १४ हजार ९८४ प्रकल्पग्रस्त कुटुंबांपैकी ११ हजार ६७६ कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत.गोसीखुर्द धरणात सद्य:स्थितीत ५० टक्के सिंचन क्षमता निर्माण होऊन ८२ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. या प्रकल्पांतर्गत दोन खासगी जलविद्युत प्रकल्प  ‘बांधा-वापरा-हस्तांतर करा’ या धोरणावर विकसित करण्यात आले आहे. याद्वारे साडेसव्वीस मेगावॅट ऊर्जा निर्मिती होत आहे. गोसीखुर्द प्रकल्पामुळे १ लाख २४ हजार ६५८ हेक्टर क्षेत्रावर क्षमता निर्माण झाली आहे. एकूण क्षमता २ लाख ५० हजार ८०० हेक्टर एवढी आहे. यावर शेतकरी धान पीक घेत आहेत. या प्रकल्पाच्या एकूण सिंचनक्षमतेपैकी ४९ टक्के क्षेत्राला  बंदनलिका वितरण प्रणालीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याची कामे प्रगतिपथावर आहेत. नागपूर जिल्ह्यात २२ हजार ९९७ हेक्टर, चंद्रपूर जिल्ह्यात १ लाख ४० हजार हेक्टर तर भंडारा जिल्ह्यात ८७ हजार ६४८ हेक्टर  क्षेत्राला या सिंचन प्रकल्पाचा लाभ होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com