‘किसानपुत्र आंदोलन’कडून काळ्या दिनानिमित्त निषेध

किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने शुक्रवारी (ता.१८) राज्याच्या विविध भागात शेतकरी पारतंत्र्य दिनानिमित्त काळा दिवस पाळण्यात आला. सरकारचा िनषेध करून काळे कायदे रद्द करण्याचे मागणी करण्यात आली.
‘किसानपुत्र आंदोलन’कडून काळ्या दिनानिमित्त निषेध From ‘Kisanputra Andolan’ Protest on the occasion of Black Day
‘किसानपुत्र आंदोलन’कडून काळ्या दिनानिमित्त निषेध From ‘Kisanputra Andolan’ Protest on the occasion of Black Day

औरंगाबाद : किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने शुक्रवारी (ता.१८) राज्याच्या विविध भागात शेतकरी पारतंत्र्य दिनानिमित्त काळा दिवस पाळण्यात आला. सरकारचा िनषेध करून काळे कायदे रद्द करण्याचे मागणी करण्यात आली. या आंदोलनात संघटनेचे प्रमुख अमर हबीब सहभागी झाले होते. पुण्यासह मराठवाड्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला. पुण्यात खासदार गिरीश बापट यांना निवदेन देण्यात आले.  शेतकरी विरोधी कायदे आणि त्यांना असलेले घटनेच्या ‘३१ ब’ कलमाचे आणि अनुच्छेद ‘९’ चे संरक्षण याची माहिती आंदोलकांनी लोकांना दिली. ही घटना दुरुस्ती १८ जून १९५१ रोजी, मूळ घटना राष्ट्राला अर्पित झाल्यानंतर आणि निर्वाचित संसद स्थापित व्हायच्या आधी कशी केली गेली. सध्या अनुच्छेद ‘९’ मध्ये २८४ कायदे असून, त्यातील २५० शेतीशी निगडित असल्याची माहितीही लोकांना देण्यात आली.   १८ जून १९५१च्या पहिल्या घटनादुरुस्तीने शेतकऱ्यांना पारतंत्र्यात ढकलत त्यांचे मूलभूत हक्क डावलण्यात आला. कमाल जमीन धारणा कायदा, जमीन अधिग्रहण कायदा, आवश्यक वस्तू कायदा हे काळे कायदे रद्द करण्याचे आवाहन किसानपुत्रांनी केले. शेतकरी स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान देण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले. खासदार बापट यांना निवेदन पुण्यातील किसानपुत्रांनी खासदार गिरीश बापट यांनी भेट घेऊन त्यांना शेतकरी विरोधी कायदे व परिशिष्ट ९ रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. किसानपुत्र आंदोलनाचे समन्वयक मयूर बागुल आणि नितीन राठोड, किसानपुत्र आंदोलन माहिती तंत्रज्ञान संयोजक असलम सय्यद यांनी गुरुवारी (ता.१७) पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com