‘घटनादुरुस्ती करून आरक्षण देणे  हाच केंद्र सरकारपुढे पर्याय’ 

घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे हाच केंद्र सरकारपुढे पर्याय आहे. राज्य शासन आरक्षणासाठी सकारात्मक आहे, असे मत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले.
 ‘घटनादुरुस्ती करून आरक्षण देणे  हाच केंद्र सरकारपुढे पर्याय’  ‘Making reservations by amending the Constitution That's the decent thing to do, and it should end there.
‘घटनादुरुस्ती करून आरक्षण देणे  हाच केंद्र सरकारपुढे पर्याय’  ‘Making reservations by amending the Constitution That's the decent thing to do, and it should end there.

कोल्हापूर : घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे हाच केंद्र सरकारपुढे पर्याय आहे. राज्य शासन आरक्षणासाठी सकारात्मक आहे, असे मत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू महाराजांची सोमवारी (ता. १४) भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचेही शाहू महाराज म्हणाले. छत्रपती शाहू महाराज म्हणाले, ‘‘सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असून, त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तो निकाल समजून घेऊन जे शक्य आहे, ते सर्व केले पाहिजे. मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष असून, यापुढेही राहणार आहे. आंदोलनाबाबत आमच्यात कोणती चर्चा झालेली नाही. मराठा समाजाने आता स्वत: सक्षम होऊन आपल्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा ज्यांनी अभ्यास केला नाही, त्यांनी तो करणे गरजेचा आहे. त्याचे मराठीत भाषांतर करून अर्थ समजून घेतला पाहिजे. तसेच कोर्टाचा अवमानही होता कामा नये.’’ सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, या दोन्ही संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com