पुणे जिल्ह्यातील १ हजार शेतकरी होणार कृषी निर्यातदार

पुणे ः जिल्ह्यात १ हजार शेतकरी कृषी निर्यातदार होणार आहेत. कृषी विभागाच्या ‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेवर आधारित कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चरतर्फे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तालुकानिहाय निर्यातक्षम शेतमाल उत्पादन आणि निर्यातदार होण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील १ हजार शेतकरी होणार कृषी निर्यातदार
1000 farmers in Pune district will be agricultural exporters

पुणे ः जिल्ह्यात १ हजार शेतकरी कृषी निर्यातदार होणार आहेत. कृषी विभागाच्या ‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेवर आधारित कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चरतर्फे  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तालुकानिहाय निर्यातक्षम शेतमाल उत्पादन आणि निर्यातदार होण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

शेतमालाला परदेशी बाजारपेठ मिळण्यासाठी उत्पादनापासून ते निर्यातीपर्यंतच्या विविध टप्प्यांवर येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातून ५० निर्यातदार शेतकऱ्यांचे एक दिवसीय निर्यातदार प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. प्रशिक्षणार्थी हा ‘आत्मा’ अंतर्गत शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनीचा सदस्य असावा. वयोमर्यादा कमाल ४० वर्ष असावी, शिक्षण दहावी उत्तीर्ण असावे, व्यवसाय करण्याची इच्छा असावी. एका गावातून क इच्छुक शेतकरी या निकषानुसार शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. निर्यात संधी, विपणन आणि ब्रँडिंग, निर्यात प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे, अर्थ व्यवस्थापन आणि कृषी निर्यात योजना हे निर्यातदार प्रशिक्षणातील विषय  असतील.  

शेतकरी नोंदणी मर्यादित असल्यामुळे प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्व नोंदणी आवश्यक आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत पूर्व नोंदणी करून प्रशिक्षण सत्रात सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे (०२० -२५५३०४३१) या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.