सोलापुरातील १३ साखर कारखाने ‘लाल यादी’त

`एफआरपी’प्रमाणे पैसे दिले, याची यादी साखर आयुक्तांनी जाहीर केली असून, त्यात सोलापूर जिल्ह्यातील १३ साखर कारखाने अपूर्ण एफआरपी देणाऱ्या कारखान्यांच्या ‘लाल यादी’त आले आहेत.
सोलापुरातील १३ साखर कारखाने ‘लाल यादी’त
13 sugar factories in Solapur are on 'red list'

माळीनगर, जि. सोलापूर ः यंदाच्या गाळप हंगामात आतापर्यंत राज्यातील किती साखर कारखान्यांनी `एफआरपी’प्रमाणे पैसे दिले, याची यादी साखर आयुक्तांनी जाहीर केली असून, त्यात सोलापूर जिल्ह्यातील १३ साखर कारखाने अपूर्ण एफआरपी देणाऱ्या कारखान्यांच्या ‘लाल यादी’त आले आहेत.  

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी त्याची माहितीही थेट साखर विभागाच्या संकेतस्थळावरही ऑनलाइन प्रसिद्ध केली आहे. कायद्यानुसार शंभर टक्के एफआरपी अदा करणारे कारखान्यांना परिशिष्टात हिरव्या रंगाची ओळख दिली आहे. तर शंभर टक्क्यांच्या आत एफआरपी दिलेले कारखाने पिवळ्या रंगाने दर्शविण्यात आली आहेत. तर ऐंशी टक्क्यांपर्यंत एफआरपी दिलेले नारंगी रंगाने, तसेच ६० टक्क्यांपर्यंत एफआरपी अदा केलेले कारखाने लाल रंगाने दर्शविले आहेत. 

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ही माहिती https://sugar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रामुख्याने साठ टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिलेल्या कारखान्यांना लाल यादीत टाकले आहे. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात २० कारखाने सुरू आहेत. त्यात पाच-सात कारखान्यांनीच रक्कम पूर्ण दिलेली आहे. या कारखान्यांनी विशेषतः ६० टक्क्यांपर्यंत एफआरपी दिली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक १३ साखर कारखान्यांचा समावेश आहे. त्यात अनेक नेत्यांच्या कारखान्यांचा समावेश आहे.

  जिल्ह्यातील ६० टक्क्यांपर्यंत एफआरपी दिलेले कारखाने एफआरपीची रक्कम ६० टक्क्यांपर्यंत दिलेल्या कारखान्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील लोकनेते बाबूराव पाटील कारखाना-अनगर, औदुंबररावजी पाटील-आष्टी, युटोपियन शुगर्स- मंगळवेढा, सिद्धनाथ शुगर- तिऱ्हे, सिद्धेश्‍वर कारखाना- कुमठे, भैरवनाथ शुगर- लवंगी, जयहिंद शुगर-आचेगाव, ओंकार-चांदापुरी, भैरवनाथ शुगर-आलेगाव, संत दामाजी- मंगळवेढा, इंद्रेश्‍वर शुगर- बार्शी, भैरवनाथ शुगर- विहाळ, जकाराया शुगर- मोहोळ या कारखान्यांचा समावेश आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com