कोल्हापुरातील १६, तर सांगलीतील चार गावे वीजबिल थकबाकीमुक्त

कोल्हापूर ल्ह्यातील १६, तर सांगली जिल्ह्यातील चार गावे थकबाकीमुक्त झाली आहेत.
कोल्हापुरातील १६, तर सांगलीतील  चार गावे वीजबिल थकबाकीमुक्त
16 in Kolhapur and 16 in Sangli Four villages free from electricity bill arrears

कोल्हापूर : कृषी ग्राहकांची चालू व थकीत वीजबिलांची जिल्ह्यात ३९७ कोटी, तर सांगली जिल्ह्यात १ हजार १९१ कोटी इतकी थकबाकी आहे. जिल्ह्यातील १६, तर सांगली जिल्ह्यातील चार गावे थकबाकीमुक्त झाली आहेत.  कृषी धोरण २०२० अंतर्गत जिल्ह्यात ९२ हजार ७९९ ग्राहकांनी सहभाग नोंदवून १३८ कोटी ८७ लाख, तर सांगली जिल्ह्यात ८९ हजार ६८६ ग्राहकांनी १३८ कोटी २२ लाख रुपये चालू व थकीत बिलापोटी भरले. योजनेची मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत आहे.  जिल्ह्यातील २२४४ रोहित्रांवरील, तर सांगली जिल्ह्यातील ८१२ रोहित्रांवरील ग्राहकांनी शंभर टक्के थकबाकी भरली आहे. कृषी धोरणानुसार कृषी ग्राहकांना व्याज, विलंब आकार व दंडाच्या माफीनंतर उर्वरित थकबाकीतील ५० टक्के थकबाकी भरल्यानंतर ५० टक्क्यांची माफी मिळणार आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com