19 new waters in Ratnagiri Planning work started
19 new waters in Ratnagiri Planning work started

रत्नागिरीत नव्या १९ पाणी योजनांची कामे सुरू

रत्नागिरी : केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेतून जिल्ह्यात एक हजारहून अधिक नळपाणी योजना होणार आहेत. त्यातील ६६ योजनांच्या दुरुस्तीची, तर १९ नवीन पाणी योजनांच्या कामांचा आरंभ झाला आहे.

रत्नागिरी : केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेतून जिल्ह्यात एक हजारहून अधिक नळपाणी योजना होणार आहेत. त्यातील ६६ योजनांच्या दुरुस्तीची, तर १९ नवीन पाणी योजनांच्या कामांचा आरंभ झाला आहे. ‘हर घर नल से जल’ या उद्देशाने केंद्र शासन ही योजना राबवीत आहे. जिल्ह्याचा ४५० कोटींचा आराखडा आहे.

कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरीही दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यासारखी परिस्थिती महाराष्ट्रातील अनेक भागात निर्माण होते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनमधून निधी दिला जाईल. यासाठी जिल्ह्याचा आराखडा बनविण्यात आला आहे. 

जिल्ह्यात जुन्या योजनांच्या दुरुस्तीचे ५९९ प्रस्ताव आहेत. त्यातील ९७ योजनांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. निविदांचा कालावधी ग्रामपंचायतीमार्फत ठरवण्यात आला आहे. पुढील महिन्याभरात ठेकेदार निश्‍चित करून कामांना वर्कऑर्डरही दिली जाईल. ६६ कामे लवकरच चालू करण्यात येतील. त्यांना वर्कऑर्डर दिली गेली, तर ६६ योजनांची दुरुस्ती कामे हाती घेण्यात आली आहेत. ती पुढील दोन महिन्यात पूर्ण होतील, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

नवीन योजनांच्या आराखड्यात जिल्ह्यातील ४७८ कामांचा समावेश आहे. त्यामध्ये २९ योजनांची निविदा काढल्या आहेत. १९ कामांच्या वर्कऑर्डर दिल्या आहेत. एकोणीस कामे चालू केली आहेत. ती पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक घरात पाणी मिळेल. 

वाड्यांत मिळणार पाणी

जलजीवन मिशन योजनेची जोरदारपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे गेली काही वर्षे टंचाईग्रस्त असलेल्या अनेक गावे आणि वाड्यांचा त्यात समावेश केला आहे.  - विक्रांत जाधव, अध्यक्ष, जिल्हा परिषद.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com