राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के पाणीसाठा 

राज्यात १३ जूनअखेरपर्यंत राज्यातील तीन हजार २६७ प्रकल्पांमध्ये ३०७ टीएमसी (८७१२.९३ दशलक्ष घनमीटर) म्हणजेच २१.३७ टक्के पाणीसाठा होता.
dam
dam

पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी वाढल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. राज्यात १३ जूनअखेरपर्यंत राज्यातील तीन हजार २६७ प्रकल्पांमध्ये ३०७ टीएमसी (८७१२.९३ दशलक्ष घनमीटर) म्हणजेच २१.३७ टक्के पाणीसाठा होता. गेल्यावर्षी याच काळात २४.२१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. 

राज्यात दरवर्षी मे महिन्यात तीव्र पाण्याची टंचाई भासते. यंदा काही ठिकाणी टॅंकरने पाणी पुरवठा सुरू होता. गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे प्रकल्पांमध्ये चांगला साठा झाला होता. तसेच भूजल पातळीत वाढ होऊन विहिरींना आणि बोअरवेलला चांगले पाणी आले. मात्र, काही भागांत पाण्याचा अति उपसा होत असल्यामुळे फेब्रुवारीपासून अनेक गावांमध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या होत्या. मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला होता. त्याचाही काही प्रमाणात परिणाम झाल्याने उन्हाळ्यात पाण्याची मागणी कमी झाली. त्यामुळे धरणांत एप्रिलअखेरपर्यंत बऱ्यापैकी पाणी शिल्लक होते.  पुणे विभागात सर्वाधिक पाणी  पुणे विभागात ९८.८५ टीएमसी म्हणजेच १८.४१ टक्के पाणीसाठा आहे. कोकण विभागात ३३.६४ टीएमसी (२७.१५ टक्के), अमरावती विभागात २८.२४ टीएमसी (१९.६३ टक्के) नागपूर विभागात ४१.५९ टीएमसी (२५.५७ टक्के) नाशिक विभागात ४३.६५ टीएमसी (२०.६ टक्के) तर औरंगाबाद विभागात ६१.६० टीएमसी म्हणजेच २३.६७ टक्के पाणीसाठा आहे.  प्रकल्पनिहाय पाणीसाठा (टीमसीमध्ये) 

प्रकल्प संख्या पाणीसाठा टक्के 
मोठे प्रकल्प १४१ २६१.८६ २५.६ 
मध्यम प्रकल्प २५८ ३०.५३ १५.९८ 
लघु प्रकल्प २८६८ १५.२० ६.७३ 
एकूण ३,२६७ ३०७.६० २१.३७ 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com