रत्नागिरीत २३८ शेतकऱ्यांना  मिळाला पीकविमा 

खरीप हंगामासाठी पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. यावर्षी ७५३ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा लाभ घेतला होता. आतापर्यंत २५१ लाभार्थी शेतकऱ्यांपैकी २३८ शेतकऱ्यांना पीकविमा योजनेची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे.
 रत्नागिरीत २३८ शेतकऱ्यांना  मिळाला पीकविमा  238 farmers in Ratnagiri Got crop insurance
रत्नागिरीत २३८ शेतकऱ्यांना  मिळाला पीकविमा  238 farmers in Ratnagiri Got crop insurance

रत्नागिरी : खरीप हंगामासाठी पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. यावर्षी ७५३ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा लाभ घेतला होता. आतापर्यंत २५१ लाभार्थी शेतकऱ्यांपैकी २३८ शेतकऱ्यांना पीकविमा योजनेची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे. उर्वरित १३ लाभार्थ्यांची नुकसानभरपाईची रक्कम मात्र लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.  खरीप हंगामात जिल्ह्यात मुख्यत्वे भात पिकाचे उत्पादन घेण्यात येते. जिल्ह्यात ६९ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येते. पावसावर अवलंबून भात शेती असून, जिल्ह्याची भाताची उत्पादकता चांगली आहे. भाताच्या उत्पादकतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असेल तर विमा परतावा देण्यात येतो. मात्र, उत्पादकता चांगली असल्याने गेल्या दोन वर्षांपर्यंत शेतकऱ्यांना विमा परतावा प्राप्त झाला नव्हता. मात्र, गेले दोन वर्षे काढणी पश्चात भात शेतीच्या पावसामुळे व पुरामुळे नुकसान होत असल्याने काढणी पश्चात नुकसानीचा समावेश विमा योजनेंतर्गत करण्यात आला आहे. या वर्षी काढणी पश्चात २३० शेतकऱ्यांच्या भात पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना १४ लाख २७ हजार ७०० रुपयांचा परतावा प्राप्त झाला आहे. महसूल मंडलातील १३ लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगानंतर परतावा दिला जाणार आहे. त्याचे वितरण रखडले आहे. भात पिकाचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असेल तर पीकविमा परतावा दिला जातो. मात्र, कोकणात ७० टक्क्यांपेक्षा उंबरठा उत्पादन आहे. त्यामुळे २०१८ पर्यंत शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक विमा योजनेंतर्गत लाभ मिळाला नव्हता. २०१९मध्ये पुरामुळे नुकसान झाल्याने सरसकट नुकसानभरपाई देण्यात आली होती.  जिल्ह्यातील ६९ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर भाताचे उत्पादन घेण्यात येते. जिल्ह्याची भाताची उत्पादकता २४.७३ क्विंटल आहे. उत्पादकता जिल्ह्याची चांगली आहे; परंतु भात पीक काढणीनंतर अवेळीच्या पावसामुळे होत असलेले नुकसान ग्राह्य धरून शेतकऱ्यांना परतावा देण्यात येत आहे. या वर्षी २३८ शेतकऱ्यांना काढणी पश्चात झालेल्या नुकसानीबद्दल परतावा प्राप्त झाला आहे. पीक कापणी प्रयोग महसूल मंडलांतर्गत राबविण्यात येतो. प्रत्येक महसूल मंडळात हा प्रयोग राबविल्यानंतर उत्पादकता निश्चित केली जाते. कमी उत्पादकता असणाऱ्या मंडलातील शेतकऱ्यांना परतावा दिला जाणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com