पुण्यातील ३३ गावे हागणदारीमुक्त

पुणे जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायतीतील ३३ गावे स्वातंत्र्य दिनी हागणदारीमुक्त अधिक स्वयंघोषित करण्यात आली आहेत.
पुण्यातील २८ ग्रामपंचायतींमधील  ३३ गावे झाली हागणदारीमुक्त In 28 Gram Panchayats of Pune 33 villages became Hagandari-free
पुण्यातील २८ ग्रामपंचायतींमधील  ३३ गावे झाली हागणदारीमुक्त In 28 Gram Panchayats of Pune 33 villages became Hagandari-free

निरगुडसर, जि. पुणे :  पुणे जिल्ह्यात स्वच्छता अभियान अंतर्गत गावस्तरावर स्वच्छता विषयक केलेले कामे व नियमित स्वच्छता असलेल्या जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायतीतील ३३ गावे स्वातंत्र्य दिनी हागणदारीमुक्त अधिक स्वयंघोषित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील उर्वरित सर्व गावे २०२१/२२ या वर्षात हागणदारीमुक्त अधिक करण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.  जिल्ह्यात स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) पहिल्या टप्पा अंतर्गत जिल्हा मार्च २०१७ मध्ये हागणदारीमुक्त करण्यात आला. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा दोन अंतर्गत जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये वैयक्तीक शौचालय प्रमाणेच शाळा, अंगणवाडी व येणारे अभ्यांगतांकरीता स्वच्छतेच्या सुविधा तसेच गावात सार्वजनिक ठिकाणी, शाळा, अंगणवाडी येथे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करून गावे शाश्वत स्वच्छ करण्यात येत आहेत.  हागणदारीमुक्त अधिक बाबतचे  निकष खालील प्रमाणे  गावातील सर्व कुटुंबांकडे, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय येथे शौचालयाच्या सुविधा असावे. गावात आवश्यकते प्रमाणे सार्वजनिक शौचालय सुविधा/फिरत्या स्थलांतरित लोकसंख्येसाठी सार्वजनिक शौचालय सुविधा असावे. हागणदरीमुक्त शाश्वतता, शौचालयांचा योग्य वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छतेच्या सवयी आणि शाश्वत स्वच्छता इ. अनुषंगाने माहिती शिक्षण व संवादाचे किमान पाच संदेश गावातील दर्शनी ठिकाणी लावलेले असावेत. हागणदारीमुक्त अधिक घोषित केलेल्या गावांची  संपूर्ण पडताळणी घोषित केल्यानंतरच्या ९० दिवसांपर्यंत राज्य स्तरावरून निश्चित करण्यात आलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. यानुसार जिल्ह्यात संतगाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत तालुकास्तरीय प्रथम व द्वितीय आलेले ग्रामपंचायती व गावे तसेच तालुक्यातील ज्या गावांमध्ये स्वच्छतेचे काम चांगले आहे, अशा गावांपैकी ज्या गावांमध्ये वरील निकषांची पूर्तता होत आहे, असे २८ ग्रामपंचायतीतील ३३ गावे १५ ऑगस्ट २०२१ रोजी हागणदारीमुक्त अधिक रोजी घोषित करण्यात आली आहेत.  हागणदरीमुक्त अधिक तालुकानिहाय ग्रामपंचायती  आंबेगाव : राजेवाडी, बारामती : मेखळी, सांगवी, कटफळ, भोर : ससेवाडी, साळवडे व आपटी,  दौंड : सहजपूर, भांडगाव, हवेली : गो-हे बु., अष्टापूर,  इंदापूर : चिखली, शहा, सपकळवाडी व कांदलगाव, जुन्नर : ठिकेकरवाडी, काळवाडी, खेड : कान्हेवाडी तर्फे चाकण, खरपूडी खु., मावळ : देवले, कडधे मुळशी : भूगाव, पुरंदर : काळदरी, धालेवाडी. शिरूर : विठ्ठलवाडी, चिंचोली मोराची, वेल्हा : घोल, कोलंबी.

प्रतिक्रिया पुणे जिल्ह्यातील १४०० ग्रामपंचायती अंतर्गत असणारी सर्व महसुली गावे सन २०२१/२२ या वर्षी हागणदारीमुक्त अधिक करण्यात येणार आहेत. त्याकरिता जिल्ह्यामध्ये मोहीम स्वरूपात स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबवून गावपातळीवर स्वच्छता ठेऊन गावे हागणदारीमुक्त अधिक घोषित करण्यात येणार आहेत. -आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com