मुंबईत गुरुवारी २८३ नवे कोरोना रुग्ण; २ जण दगावले

बुधवारच्या तुलनेत मुंबईत कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसते. गुरुवारी (ता. ११) २८३ नवीन रुग्ण आढळले, तर २ रुग्ण दगावले आहेत.
मुंबईत गुरुवारी २८३ नवे कोरोना रुग्ण; २ जण दगावले
मुंबईत गुरुवारी २८३ नवे कोरोना रुग्ण; २ जण दगावले

मुंबई : बुधवारच्या तुलनेत मुंबईत कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसते. गुरुवारी (ता. ११) २८३ नवीन रुग्ण आढळले, तर २ रुग्ण दगावले आहेत. बुधवारी ३४७ नवीन रुग्ण सापडले होते. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७,५८,८१९ वर पोहोचली आहे. १७६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ७,३७,१२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

२ कोविड मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा १६,२८७ वर पोचला आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के असून कोविड वाढीचा दर ०.०३ टक्के झाला आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी २१५३ दिवस झाला आहे. मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या २८६३ आहे. गुरुवारी दिवसभरात ३७,५१७ कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत १,१७,९२,२४६ एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.