सांगलीतील ३३ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित 

केंद्र सरकारने खतांच्या किमती कमी करून त्या बाबत स्पष्ट आदेश दिल्यानंतरही जादा दराने खत विक्री करणाऱ्या तीन कृषी दुकानांवर आणि ३० दुकानदारांनी वेळेवर नूतनीकरण न केल्याने त्यांचे परवाने निलंबित केले आहेत.
agri inputs shops
agri inputs shops

सांगली : केंद्र सरकारने खतांच्या किमती कमी करून त्या बाबत स्पष्ट आदेश दिल्यानंतरही जादा दराने खत विक्री करणाऱ्या तीन कृषी दुकानांवर आणि ३० दुकानदारांनी वेळेवर नूतनीकरण न केल्याने त्यांचे परवाने निलंबित केले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्ताळी यांनी दिली. 

रासायनिक खतांच्या किमतीमध्ये कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात वाढ केली होती. परंतु केंद्र शासनाने खतासाठी जादा अनुदान घोषित करून खताच्या किमती नियंत्रित केल्या आहेत. शेतकऱ्यांना सुधारित कमी झालेल्या किमतीनुसार खत उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्ह्यामधील सर्व खत कंपनी प्रतिनिधी व खत वितरकांना ऑनलाइन बैठक घेऊन सक्त सूचना दिल्या आहेत. जर कोणी जादा दराने खताची विक्री केली तर संबंधितांचा विक्री परवाना निलंबित करून कायमस्वरूपी परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट केले होते. 

जिल्ह्यातील श्री दत्त कृषी सेवा केंद्र मिरज व बेडग यांच्याकडून जादा दराने विक्री होत असल्याने त्यांच्यावर कारवाई केली आहे. जिल्ह्यात खताचे होलसेल व रिटेल, असे एकूण ३ हजार १७५ वितरक आहेत. जिल्ह्यामध्ये १५ एप्रिलपासून सहा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. निविष्ठा गुणनियंत्रण कामकाजासाठी जिल्ह्यात ३२ गुणनियंत्रण निरीक्षक व ११ भरारी पथकामार्फत निविष्ठा वितरकांचे तपासणी व बियाणे खते औषधे नमुने काढण्यात येत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर जे वितरक विहित कालमर्यादेत परवाना नूतनीकरण केलेले नाहीत व जादा दराने खत विक्री करत आहेत. अशा परवानाधारक त्यांचे ३० परवाने निलंबित करण्यात आले आहेत व त्यांना नोटीस बजावून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.  तालुकानिहाय कारवाई  मिरजेतील २ कृषी सेवा केंद्रांवर, वाळव्यातील १० , शिराळा येथील २, खानापूर- २, तासगाव-७, कडेगाव, पलूस आटपाडी तालुक्यातील प्रत्येकी एक, कवठेमहांकाळ तालुका ३ आणि जत तालुक्यातील ४ कृषी सेवा केंद्रांचा समावेश आहे.  प्रतिक्रिया जिल्ह्यातील सर्व निविष्ठा वितरकांची २९ व ३० मेला तपासणीचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात कुठेही जादा दराने निविष्ठा विक्री किंवा खतांची विक्री होत असेल तर शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी तसेच जिल्हास्तरावर संनियंत्रण कक्षात तक्रार दाखल करावी.  - बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com