
नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील बॅंकांनी यंदाच्या खरीप हंगामात आजवर ६८ हजार ५४८ शेतकऱ्यांना ३५० कोटी ६४ लाख ६० हजार रुपयांचे पीक कर्जवाटप केले. उद्दिष्टांपैकी नांदेड जिल्ह्यात १०.०६ टक्के, परभणीत ६.६९ टक्के, हिंगोलीत ५४.६७ टक्के पीक कर्जवाटप झाले. या तीन जिल्ह्यांत जिल्हा बॅंकेने पीक कर्जवाटपात आघाडी घेतली आहे. राष्ट्रीयीकृत, ग्रामीण बॅंका पिछाडीवर आहेत.
नांदेड जिल्ह्यातील बॅंकांना यंदा १ हजार ९६७ कोटी ५१ लाख रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील बॅंकांनी शनिवार (ता. २२) पर्यंत ३७ हजार ९९५ शेतकऱ्यांना १९७ कोटी ९८ लाख रुपये (१०.०६ टक्के) पीककर्ज वाटप केले. सार्वजनिक क्षेत्रातील (राष्ट्रीयीकृत) बॅंकांना १ हजार ३६० कोटी ७ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे. त्यांनी ३ हजार ३७९ शेतकऱ्यांना २७ कोटी ५६ लाख रुपये (२.०३ टक्के) वाटप केले.
खासगी बॅंकांनी १५१ कोटी ६७ लाख रुपये उद्दिष्टापैकी ८८६ शेतकऱ्यांना २० कोटी ७२ लाख रुपये वाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने २७७ कोटी १७ लाख रुपयांपैकी २ हजार ८४७ शेतकऱ्यांना २२ कोटी ४७ लाख रुपये (८.११ टक्के) पीक कर्जवाटप केले. जिल्हा बॅंकेने १७८ कोटी ६० लाखांपैकी ३० हजार ८८३ शेतकऱ्यांना १२७ कोटी २३ लाख रुपये (७१.२४ टक्के) वाटप केले.
परभणी जिल्ह्यात या वर्षी १ हजार ४७० कोटी ४४ लाख २३ हजार रुपये उद्दिष्ट आहे. सोमवार (ता. २४)पर्यंत १७ हजार ८२६ शेतकऱ्यांना ९८ कोटी ४२ लाख रुपये (६.६९ टक्के) पीककर्जाचे वाटप केले. व्यापारी बॅंकांनी १ हजार ५२ कोटी ३६ लाखांपैकी ३ हजार ४५९ शेतकऱ्यांना ३७ कोटी ८१ लाख रुपये (३. ५९ टक्के), खासगी बॅंकांनी ५२ कोटी ४७ लाखांपैकी १ हजार ५६ शेतकऱ्यांना ९ कोटी ९५ लाख (१८.९६ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने २०० कोटी १४ लाख रुपयांपैकी १ हजार ९५ शेतकऱ्यांना ९ कोटी ४१ लाख रुपये (४.७० टक्के) कर्जवाटप केले. जिल्हा बॅंकेने १६५ कोटी ४७ लाखांपैकी १२ हजार २१६ शेतकऱ्यांना ४१ कोटी २५ लाख रुपये (२४.९३ टक्के) वाटप केले.
हिंगोलीतील बॅंकांनी १ हजार १६१ कोटी ९७ लाखांपैकी १२ हजार ७२७ शेतकऱ्यांना ५४ कोटी २४ लाख ६० हजार रुपयांचे (४.६७ टक्के) वाटप केले. व्यापारी बॅंकांनी ८५३ कोटी ९६ लाखांपैकी १ हजार ७१२ शेतकऱ्यांना १८ कोटी ३७ लाख २२ हजार रुपये (२.१५ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने १६० कोटींपैकी ७६० शेतकऱ्यांना ६ कोटी २६ लाख ५० हजार रुपये पीक कर्जवाटप केले.
जिल्हानिहाय पीक कर्जवाटप स्थिती (कोटी रुपये)
जिल्हा | शेतकरी संख्या | पीककर्ज रक्कम | टक्केवारी |
नांदेड | ३७९९५ | १९७.९८ | १०.०६ |
परभणी | १७८२६ | ९८.४२ | ६.६९ |
हिंगोली | १२७२७ | ५४.२४६० | ४.६७ |
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.