राज्यात ३५ हजार कोटींची गुंतवणूक ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीत देशाचे महत्त्वाचे केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट असल्याची माहिती सोमवारी (ता. २) दिली.
35,000 crore investment in the state: Chief Minister Uddhav Thackeray
35,000 crore investment in the state: Chief Minister Uddhav Thackeray

मुंबई : महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीत देशाचे महत्त्वाचे केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट असल्याची माहिती सोमवारी (ता. २) दिली.

कोरोना नंतर महाराष्ट्रासाठी जगाचे दरवाजे उघडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कोरोना परिस्थितीतून नुसते बाहेर नाही पडणार तर अधिक सामर्थ्याने देशात आघाडी घेईल, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

श्री. ठाकरे यांच्या उपस्थितीत एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. १५ कंपन्यांमार्फत जवळपास ३४ हजार ८५० कोटींची गुंतवणूक राज्यात होत आहे. या गुंतवणुकीमुळे २३ हजार १८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. युनिटी इन डायव्हर्सिटी असा हा करार आहे. जिथे विविध क्षेत्रातील उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. आपल्या उज्वल भविष्यासाठी तुमच्या प्रगतीत आमचा सहभाग असेल, अशी ग्वाही ठाकरे यांनी गुंतवणूकदारांना दिली.

गुंतवणूकदार आणि राज्य सरकार यांचा एकमेकांवर विश्वास आहे. त्यामुळे मागील सामंजस्य करारातील ६० टक्के उद्योगांच्या बाबतीत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सल्लागार अजोय मेहता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनबलगन आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com