औरंगाबादच्या ३८५ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी

औरंगाबाद : कोविड, महसुलात घट आदींमुळे जिल्ह्याला ७० कोटी रुपये अधिक देत ३८५ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.२१) मंजुरी दिली.
औरंगाबादच्या ३८५ कोटींच्या  प्रारूप आराखड्यास मंजुरी
385 crore of Aurangabad Approval of the draft

औरंगाबाद : कोविड, महसुलात घट आदींमुळे जिल्ह्याला ७० कोटी रुपये अधिक देत ३८५ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.२१) मंजुरी दिली. 

औरंगाबाद जिल्हा वार्ष‍िक सर्वसाधारण योजनेत ३१५ कोटीच्या मर्यादेत पालकमंत्री सुभाष देसाई, जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने ५०० कोटी रुपयांचा १८४ कोटी रुपयांच्या वाढीव मागणीसह प्रारूप आराखडा सादर केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्ष‍िक योजना (सर्वसाधारण) २०२२-२३ प्रारूप आढावा बैठक पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, प्रशांत बंब, उदयसिंग राजपूत, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलिस अधीक्षक निमित्त गोयल, महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदावले, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष जुंजारे आदी उपस्थित होते.

देसाई म्हणाले, ‘‘मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद आहे. या ठिकाणी मराठवाड्यासह मराठवाड्याला लागून असलेल्या इतर विभागांच्या जिल्ह्यांचे रुग्णही उपचारासाठी दाखल होतात. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बंधारे वाहून गेले आहेत. त्यांची दुरुस्ती करणे आहे. रस्त्यांचेही नुकसान झाले आहे. पर्यटन सुविधा, अत्याधुनिक पोलिस वाहने, शाळा दुरुस्ती आदी बाबींच्या विकासासाठी निधी आवश्यक आहे. त्यामुळे वाढीव १८४.१६ कोटी निधी मंजूर करावा.’’

चव्हाण यांनी जिल्हा वार्ष‍िक योजना (सर्वसाधारण) २०२२-२३ चा प्रारूप १८४.१६ कोटीच्या अतिरिक्त मागणीसह ५०० कोटींचा आराखडा सादर केला. यामध्ये कृषी व संलग्न सेवांसाठी १९.२५, ग्रामविकास ११.७४, सामाजिक व सामुहिक सेवा ६९.९५, पाटबंधारे व पूरनियंत्रण १७.५३ कोटी या एकूण गाभा क्षेत्रासाठी ११८.४७ कोटी आणि अपारंपरिक ऊर्जा ७.३५, परिवहन ११.९५, सामान्य सेवा ३२.३२ आणि सामान्य आर्थिक सेवा यांसाठी ४.८६ अशा बिगर गाभा क्षेत्रासाठी ५६.४८ कोटी, तर इतर योजनांसाठी ९.२१ कोटी असे एकूण १८४.१६ कोटी रुपयांची ३१५.८४ कोटीच्या कमाल आर्थिक मर्यादेनुसार अति‍रिक्त मागणी १८४.१६ कोटी रुपयांचा २२-२३ चा प्रारूप आराखडा सादर केला.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.