मावळात ४० नळ पाणी पुरवठा योजनांना मान्यता

पुणे : वडगाव मावळ : ‘जल जीवन मिशन’अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. दुसऱ्या टप्यातील ४० नळ पाणीपुरवठा योजनांना तत्त्वतः मान्यता मिळाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
40 tap water in Maval Approval of supply schemes
40 tap water in Maval Approval of supply schemes

पुणे : वडगाव मावळ :  ‘जल जीवन मिशन’अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. दुसऱ्या टप्यातील ४० नळ पाणीपुरवठा योजनांना तत्त्वतः मान्यता मिळाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, जागेची उपलब्धता, ठराव व इतर प्रलंबित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आमदार शेळके यांनी नुकतीच वडगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे ग्रामपंचायत प्रतिनिधी, ग्रामसेवकांची आढावा बैठक घेतली.  या वेळी गटविकास अधिकारी सुधीर भागवत, नारायण ठाकर, उपअभियंता अरविंद चाटे, शाखा अभियंता जयदीप अग्निहोत्री, रितेश मुंडे, रूपाली मोहारले, कल्पेश मराठे, मयूर झोडगे, ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी, ग्रामसेवक उपस्थित होते.

ग्रामीण भागातील गावे व वाड्या वस्त्यांवर नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी सहजपणे उपलब्ध होत नव्हते. ही समस्या सोडविण्यासाठी ‘जल जीवन मिशन’अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. 

मावळातील निमशहरी गावांतील जुन्या पाणीपुरवठा योजनांवर वाढत्या नागरीकरणाचा ताण येत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पहिल्या टप्प्यात २० पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. तर पुढील काळात राबविण्यात येणाऱ्या ४० नळ पाणीपुरवठा योजनांसाठी शेळके यांनी ग्रामपंचायत प्रतिनिधी व ग्रामसेवक व अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेतली.

सध्या पहिल्या टप्प्यातील २७ नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामास सुरवात करण्यात आली आहे. तालुक्यातील उर्वरित गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेला मान्यता मिळाली आहे. नळ पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत प्रतिनिधी, ग्रामसेवकांनी त्यांच्या गावातील उर्वरित बाबी गांभीर्यपूर्वक पूर्ण करून घ्याव्यात. अधिकाऱ्यांनीही पाठपुरावा करून तत्काळ पुढील कार्यवाही करून घ्यावी, अशा सूचना शेळके यांनी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com