आंबेगावच्या ४०० श्रमिकांची ‘ई-श्रम कार्ड’साठी नोंदणी

पुणे : केंद्र सरकारच्या, श्रम व रोजगार मंत्रालयाच्या वतीने देशभरातील असंघटित कामगारांची नोंद करण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे.
आंबेगावच्या ४०० श्रमिकांची  ‘ई-श्रम कार्ड’साठी नोंदणी
400 workers of Ambegaon Registration for ‘e-Shram Card’

पुणे : केंद्र सरकारच्या, श्रम व रोजगार मंत्रालयाच्या वतीने देशभरातील असंघटित कामगारांची नोंद करण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. सरकारच्या योजनांचा फायदा थेट असंघटित क्षेत्रातील कामगारांना मिळण्यासाठी केंद्र सरकारकडून ई-श्रम कार्ड देण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यानुसार आंबेगाव तालुक्यातील सुमारे ४०० श्रमिकांची नोंदणी करण्यात आली आहे.

किसान सभा, आंबेगाव तालुका समितीतर्फे तालुक्यातील सुमारे ४०० असंघटित कामगार व श्रमिकांचे, ई- श्रम कार्ड तयार करण्यात आले आहे. त्यांचे प्रातिनिधिक वितरण प्रजासत्ताक दिनानिमित्त घोडेगाव येथे झाले. घोडेगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या हस्ते प्रातिनिधिक दहा श्रमिक महिला-पुरुषांना ई-श्रम कार्ड देण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते जिंदा सांडभोर, किरण लोहकरे, किसान सभेचे डॉ. अमोल वाघमारे, अशोक पेकारी, राजू घोडे, नीलेश काणव, सीताराम काळे आदी उपस्थित होते.

कामगारांचा डेटाबेस तयार करण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू आहे. सद्यःस्थितीत या कामगारांना या, ई-श्रम कार्डमुळे विमा कवच प्राप्त होत आहे. किसान सभेच्या पुढाकाराने व अभिनव सेवा केंद्र आणि एकता कॉम्प्युटरच्या तांत्रिक सहकार्याने श्रमिकांची नोंदणी करण्यात आली. श्रमिकांना घरपोच कार्ड तीन दिवसांत प्रदान केले जाईल.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.