‘विष्णुपुरी’तून ४७१ क्सुसेकने विसर्ग

गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातून ४७१ क्सुसेक वेगाने गोदावरी नदीत पाणी सोडण्यात येत आहे. रविवारी झालेला पावसामुळे सोमवारी पहाटे १२.४५ वाजता प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला.
471 cusecs of water released from Vishnupuri
471 cusecs of water released from Vishnupuri

नांदेड : गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातून ४७१ क्सुसेक वेगाने गोदावरी नदीत पाणी सोडण्यात येत आहे. रविवारी झालेला पावसामुळे सोमवारी पहाटे १२.४५ वाजता प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला. पाण्याचा येवा सुरू असल्याने पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाचे पूर नियंत्रण अधिकारी अर्जून सिंगणवाड यांनी ॲग्रोवनशी बोलताना दिली.

नांदेड जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांपैकी एक असलेल्या विष्णुपुरी येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण जलाशयात यंदा जूनमध्ये पहिल्यांदाच पाण्याचा येवा सुरू झाला. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने शनिवारी प्रकल्पात ९४ टक्के पाणीसाठा झाला होता. यानंतर रविवारी पाऊस झाला. यामुळे विष्णुपुरी प्रकल्पात येवा वाढला. 

परिणामी सोमवारी मध्यरात्री १२.४५ वाजता प्रकल्पाचा सात क्रमांकाचा दरवाजा उघडण्यात आला. यातून ४७१ क्सुसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. सध्या पाण्याचा येवा सुरू असल्याने दरवाजा उघडा असल्याची माहिती कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com