अमरावती जिल्ह्यात ४८ विहिरींचे अधिग्रहण

अमरावती जिल्ह्यात ४८ विहिरींचे अधिग्रहण
अमरावती जिल्ह्यात ४८ विहिरींचे अधिग्रहण

अमरावती : एैन हिवाळ्यातच ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. परिणामी ८ तालुक्‍यांत ४८ गावांसाठी विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. 

यंदा पाऊस कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील साठवण तलाव कोरडे पडले. मध्यम प्रकल्पातील पाणीसाठादेखील झपाट्याने कमी झाला. बोटावर मोजण्याइतपतच प्रकल्पांमध्ये थोडे पाणी आहे. 

उर्वरित प्रकल्प जोत्याखाली आहेत. विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे अनेक गावांतून टॅंकरने पाणीपुरवठ्याची मागणी जोर धरू लागली आहे. यामध्ये चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्‍वर, चिखलदरा, अमरावती, मोर्शी, अचलपूर, तिवसा, भातकुली या तालुक्‍यातील गावांचा समावेश आहे. 

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने मोर्शी तालुक्‍यातील सावरखेड येथे सद्यस्थितीत टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यावर्षी कमी पावसामुळे पाणीटंचाईची समस्या बहूतांश गावात आहे. विशेष म्हणजे एक ते दोन दिवसाआड नागरिकांना पाणी मिळत आहे. पाणीटंचाईची समस्या नसली, तरी भविष्यात ती मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे. त्यामुळे मागीलवर्षीपेक्षा यंदा टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे.

विहिरींचे अधिग्रहण (तालुकानिहाय)

अमरावती १०
नांदगाव खंडेश्‍वर 
भातकुली
तिवसा 
मोर्शी  १०
चांदूररेल्वे
अचलपूर  १४
चिखलदरा    १
एकूण ४८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com