नांदेड जिल्ह्यात अनुदानावर भुईमुगाचे ५०० क्विंटल बियाणे

नांदेड जिल्ह्यात : उन्हाळी हंगाम २०२१-२२ साठी राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान प्रसार अभियानाअंतर्गत बियाणे व लागवड साहित्य उपअभियानात भुईमूग बियाण्यासाठी ग्राम बिजोत्पादन अंतर्गत अनुदानावर जिल्ह्याला ५०० क्विंटल भुईमुगाचे बियाणे उपलब्ध झाले आहे.
नांदेड जिल्ह्यात अनुदानावर भुईमुगाचे ५०० क्विंटल बियाणे
500 quintals of groundnut seeds on subsidy in Nanded district

नांदेड जिल्ह्यात : उन्हाळी हंगाम २०२१-२२ साठी राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान प्रसार अभियानाअंतर्गत बियाणे व लागवड साहित्य उपअभियानात भुईमूग बियाण्यासाठी ग्राम बिजोत्पादन अंतर्गत अनुदानावर जिल्ह्याला ५०० क्विंटल भुईमुगाचे बियाणे उपलब्ध झाले आहे. सध्या तालुकानिहाय बियाणे वाटप होत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

भुईमूग बियाण्यांची विक्री बियाणे महामंडळ म्हणजेच महाबीजतर्फे विक्रेते व उपविक्रेत्यांमार्फत सुरु आहे. या योजनेमध्ये भुईमूग पिकात ‘टॅग -२४’ या वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना दिले आहे. २० किलो भुईमूग बॅगची मूळ किंमत ३ हजार ३०० रुपये आहे. यावर १ हजार ४०० रुपये अनुदान मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना अनुदानित किंमत १ हजार ९०० रुपये प्रति बॅग आहे.

जिल्ह्यासाठी भुईमूग पिकाचे ५०० क्विंटल बियाण्याचे लक्षांक कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त झाले आहे. या योजनेत उपलब्ध मात्रेमधून एका शेतकऱ्याला एक एकर क्षेत्राच्या मर्यादेत सातबारा, आठ - अ व आधार कार्ड, जातीचा दाखल्याची प्रत देऊन महाबीजच्या वितरकांकडून बियाणे खरेदी करता येईल. प्रथम प्राधान्य या प्रमाणे बियाणे उपलब्ध असेपर्यंत शेतकऱ्यांना अनुदानित दराने पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती महाबीजकडून देण्यात आली. 

  तालुकानिहाय उपलब्ध बियाणे  (क्विंटलमध्ये)

अर्धापूर १०, भोकर १०, बिलोली २०, धर्माबाद १०, देगलूर १०, कंधार १६०, किनवट ५०, लोहा २०, मुदखेड २०, मुखेड ११०, नायगाव २०, नांदेड २०, माहूर ३०, उमरी १०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.