पुणे जिल्ह्यातील ५२ हजार  शेतकऱ्यांच्या बांधावर खते 

पुणे जिल्ह्यातील ११ हजार २५३ गटांमार्फत ५२ हजार ७०८ शेतकऱ्यांना १० हजार ७२३ टन खते व ५ हजार ४४४९ क्विंटल बियाणे बांधावर पुरवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
 पुणे जिल्ह्यातील ५२ हजार  शेतकऱ्यांच्या बांधावर खते  52 thousand in Pune district Fertilizers on farmers' dams
पुणे जिल्ह्यातील ५२ हजार  शेतकऱ्यांच्या बांधावर खते  52 thousand in Pune district Fertilizers on farmers' dams

पुणे : खरीप हंगामाची कृषी विभागाकडून तयारी सुरू झाली आहे. दरवर्षी प्रमाणेच यंदाही खरिपात शेतकऱ्यांना बांधावर खते देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील ११ हजार २५३ गटांमार्फत ५२ हजार ७०८ शेतकऱ्यांना १० हजार ७२३ टन खते व ५ हजार ४४४९ क्विंटल बियाणे बांधावर पुरवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.  सद्य:स्थितीत कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कृषी केंद्रावर जाऊन कृषी निविष्ठा घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी व होणारी गर्दी टाळण्यासाठी कृषी विभागाने बांधावर खते देण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी गटांनी संमती दर्शविली आहे. या गटांकडे शेतकऱ्यांनी आपली मागणी नोंदवावी. त्यासाठी कृषी विभागामार्फत एक गुगल फार्म तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना आवश्यक असलेले बियाणे मागणी करण्यात येणार आहे.  गुगल फार्म तालुका स्तरावर उपलब्धता कार्यवाहीस्तव योग्य समन्वय साधण्यासाठी पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आला आहे. तरी तालुका कृषी अधिकारी यांनी या फार्मवरून  आपल्या तालुक्यात कोणत्या शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी मागणी नोंदवली आहे. ते पाहून क्षोत्रिय स्तरावरील मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी  सहाय्यक यांना यादी उपलब्ध करून देण्यात यावी. त्यानंतर कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांनी मागणीप्रमाणे कार्यवाही करावी. यासाठी आत्मा योजनेचे गावातील कृषी मित्र तसेच गावामध्ये कार्यरत असलेले शेतकरी गट प्रमुख व शेतकरी उत्पादक कंपनी यांची मदत घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर खते व बियाणे उपलब्ध होण्यासाठी मदत करावी, असेही कृषी अधीक्षक कार्यालयाने म्हटले आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com