विदर्भाला ६१ कोटी ३२ लाखांचा कोविड निधी मंजूर ः विजय वड्डेटीवार

राज्यामध्ये कोविड -१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध उपाययोजना राबवीत आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून नागपूर व अमरावती विभागाला ६१ कोटी ३२ लाख ७० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
61 crore 32 lakh sanctioned for Vidarbha: Vijay Vaddetiwar
61 crore 32 lakh sanctioned for Vidarbha: Vijay Vaddetiwar

नागपूर : राज्यामध्ये कोविड -१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध उपाययोजना राबवीत आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून नागपूर व अमरावती विभागाला ६१ कोटी ३२ लाख ७० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

कोविड -१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावतीसाठी १४ कोटी ३४ लाख ८९ हजार रुपये, यवतमाळ ५ कोटी १६ लाख ७२ हजार रुपये, बुलढाणा ३ कोटी २७ लाख १६ हजार रुपये, वाशिम १ कोटी ९८ लाख ३८ हजार रुपये, असा एकूण अमरावती विभागासाठी २४ कोटी ७७ लाख १५ हजार इतका निधी मंजूर झाला आहे. तसेच नागपूरसाठी १३ कोटी २२ लाख ०२ हजार रुपये, वर्धा ३ कोटी ७४ लाख १५ हजार, भंडारा ३ कोटी ४९ लाख ८४ हजार , गोंदिया - ४ कोटी ०३ लाख ३२ हजार, चंद्रपूर ४ कोटी ४५ लाख १४ हजार, गडचिरोली ७ कोटी ६१ लाख ०८ हजार असे एकूण नागपूर विभागासाठी ३६ कोटी ५५ लाख ५५ हजार इतका निधी मंजूर झाला आहे.

नागपूर व अमरावती विभागाला कोविड -१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी एकूण ६१ कोटी ३२ लाख ७० हजार रुपयांचा निधी मंजूर  झाला असून तो बीम्स प्रणालीवर आधारित आहे. कोविड -१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांसाठी आत्तापर्यंत एकूण ४८५ कोटी १३ लाख इतका निधी विभागीय आयुक्तांमार्फत वितरित करण्यात आला असून नागपूर ४८ कोटी रुपये, अमरावती २२ कोटी ६१ लाख रुपये, औरंगाबाद ५२ कोटी ५० लाख रुपये, नाशिक १८ कोटी ७० लाख रुपये, पुणे १०३ कोटी रुपये, कोकण २३५ कोटी २८ लाख रुपये, सार्वजनिक आरोग्य विभाग ५ कोटी ०४ लाख रुपये असे विभागीय आयुक्तांमार्फत आत्तापर्यंत कोविड -१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकूण ४८५. १३  कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे.

येणाऱ्या काळात कोविडला हद्दपार करण्यासाठी ज्या उपाययोजना आवश्यक असतील त्या शासन स्तरावर तत्परतेने राबविल्या जातील.  -  विजय वड्डेटीवार, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com