‘पोकरा’अंतर्गत ६७ कोटींची रक्कम  ‘डीबीटी’द्वारे शेतकऱ्यांना वितरित 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (हवामानाकूल कृषी प्रकल्प ः पोकरा) अंतर्गत आजवर विविध घटकांची कामे पूर्ण करून अनुदानाची मागणी केलेल्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या २२ हजार १७० अर्जांचा निपटारा करण्यात आला आहे.
67 crore under Pokra Distributed to farmers through DBT
67 crore under Pokra Distributed to farmers through DBT

हिंगोली ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (हवामानाकूल कृषी प्रकल्प ः पोकरा) अंतर्गत आजवर विविध घटकांची कामे पूर्ण करून अनुदानाची मागणी केलेल्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या २२ हजार १७० अर्जांचा निपटारा करण्यात आला आहे. एकूण ६७ कोटी १२ हजार रुपये रक्कम थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे (डीबीटी) शेतकऱ्यांना देण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

‘पोकरा’अंतर्गत तीन टप्प्यांमध्ये मिळून जिल्ह्यातील २४० गावांची निवड करण्यात आली आहे. या अंतर्गत नोंदणी केलेल्या ४१ हजार २९३ पैकी ३८ हजार ८०८ शेतकऱ्यांची पडताळणी झाली आहे. विविध घटकांच्या लाभासाठी १ लाख ११ हजार ४६८ अर्ज केलेले आहेत. ग्राम कृषी संजीवनी स्तरावरील मंजुरीसाठी १० हजार ३९१ हजार अर्ज आणि पूर्वसंमतीसाठी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी स्तरावर ३ हजार ६९ अर्ज प्रलंबित आहेत. शेतकरी स्तरावरील कामांची संख्या (बील अपलोड) १६ हजार २७१ एवढी आहे. कृषी सहायक स्तरावर मोका तपासणीसाठी ४ हजार २२१ अर्ज प्रलंबित आहेत.

उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी स्तरावर ४ अर्ज आणि अंतिम मंजुरीसाठी सहाव्या डेस्कवर ९० अर्ज प्रलंबित आहेत.  आजवर अनुदान वितरित करण्यात आलेल्या एकूण अर्जाची संख्या २२ हजार १८७ एवढी आहे. संबंधित घटकांची कामे पूर्ण करून अनुदानासाठी देयके सादर केलेल्या शेतकऱ्यांना ६७ कोटी १२ हजार ४९ रुपये एवढे अनुदान वितरित करण्यात आले आहे. अनुदानासाठी मुंबई स्तरावर १३ अर्जाचे १० लाख रुपये अनुदान प्रलंबित आहे. मृदा आणि जलसंधारणाची ४०६ कामे प्रस्तावित आहेत. त्यापैकी १५४ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. ११९ कामे पूर्ण झाली असून, त्यावर २ कोटी ९३ लाखांवर खर्च झाला आहे. 

...असे झाले अनुदानवाटप  ठिबक सिंचन संचासाठी ४ हजार ७८५ शेतकऱ्यांना ३१ कोटी ९३ लाख ८१ हजार ८९६ रुपये, तुषार संचासाठी ९ हजार १५९ शेतकऱ्यांना १५ कोटी ९२ लाख ३९ हजार ५६ रुपये अनुदान देण्यात आले. सिंचन विहिरीसाठी २१ शेतकऱ्यांना ५० लाख ६६ हजार ३५५ रुपये, तर कृषिपंपासाठी १ हजार २५२ शेतकऱ्यांना १ कोटी ७९ लाख ३४ हजार १९६ रुपये, पाइपसाठी २ हजार ६८३ शेतकऱ्यांना ४ कोटी ९३ लाख २३ हजार ८१८ रुपये अनुदान देण्यात आले.

वैयक्तिक शेततळ्यांसाठी १५ शेतकऱ्यांना ६४ लाख ८ हजार ७७२ रुपये आणि अस्तरीकरणासाठी ५ शेतकऱ्यांना ३ लाख ४७ हजार ७४० रुपये, तर मत्स्य पालनासाठी १० शेतकऱ्यांना ३ लाख ९५ हजार ५६४ रुपये अनुदान देण्यात आले. फळबाग लागवड केलेल्या १ हजार ६८ शेतकऱ्यांना ५ कोटी ४ लाख १ हजार ३७४ रुपये आणि शेडनेट गृहासाठी १९ शेतकऱ्यांना २ कोटी ४८ लाख ७३ हजार रुपये, रेशीम उद्योगासाठी २३ शेतकऱ्यांना १५ लाख ६७ हजार ९८५ रुपये, कुकुटपालनासाठी २ लाभार्थांनी २१ हजार रुपये,

शेळीपालनासाठी ४९ लाभार्थींना १९ लाख १४ हजार रुपये अनुदान देण्यात आले. कंपोस्ट खतनिर्मितीसाठी ३० शेतकऱ्यांना २ लाख १२ हजार रुपये कृषी यांत्रिकीकरणासाठी ८ शेतकऱ्यांना ४ लाख १२ हजार रुपये, शेती शाळा आयोजनासाठी ४७१ शेतकऱ्यांना १२ लाख ९४ हजार रुपये खर्च देण्यात आला. बीजोत्पादनासाठी १ हजार ५२१ शेतकऱ्यांना १ कोटी ४४ लाख ९ हजार रुपये, तर शेडनेट, पॉलिहाउस साहित्यासाठी ४ शेतकऱ्यांना ६ लाख ३ हजार रुपये अनुदान देण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com