डिंभे धरणात ७५ टक्के साठा

गेली आठ दिवस चालू असलेल्या मुसळधार पावसाने हुतात्मा बाबू गेणू जलाशय डिंभे धरण ७५.०८ टक्के भरले आहे, अशी माहिती डिंभे धरण विभाग शाखा अभियंता टी. एन. चिखले यांनी दिली.
डिंभे धरणात ७५ टक्के साठा 75% reserves in Dimbhe dam
डिंभे धरणात ७५ टक्के साठा 75% reserves in Dimbhe dam

शिनोली, जि, पुणे : गेली आठ दिवस चालू असलेल्या मुसळधार पावसाने हुतात्मा बाबू गेणू जलाशय डिंभे धरण ७५.०८ टक्के भरले आहे, अशी माहिती डिंभे धरण विभाग शाखा अभियंता टी. एन. चिखले यांनी दिली. डिंभे पाणलोट क्षेत्रात गेली आठ दिवस जोरदार पाऊस चालू आहे. धरण पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढत चालला आहे. धरणाची पाणी पातळी ७१३.६५० मीटर असून, धरणात १० टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरण ७५.०८ टक्के भरले आहे. डिंभे पाणलोट क्षेत्रात ६५४ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी या वेळी धरण ३६.५८ टक्के भरले होते. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस चालू आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस असाच चालू राहिला; तर धरणाच्या पाण्यात वाढ होईल व डावा कालवा, उजवा कालवा व नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल.

‘चासकमान’  दोन  दिवसांत भरणार चासकमान धरणाच्या (ता. खेड) पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली असून, धरणातील पाणीसाठा ८८.३३ टक्के (७.६५ टीएमसी) झाला असून, पावसाचा जोर असाच राहिल्यास एक ते दोन दिवसांतच धरण शंभर टक्के भरणार आहे. खेड व शिरूर तालुक्यासाठी ही आनंदाची बाब आहे. खेड व शिरूर तालुक्याचे नंदनवन करणाऱ्या भीमा नदीवर असणाऱ्या चासकमान धरणात केवळ आठ दिवसांत ६३ टक्के पाणीसाठा वाढला आहे. पावसाचा जोर वाढल्याने आठच दिवसांत हा साठा ८८.३३ टक्क्यांवर पोहोचला. पावसाचा जोर कायम आहे. धरणात सुमारे तीन हजार क्युसेकने आवक सुरू आहे.  गुंजवणी धरण तुडुंब वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणक्षेत्रामध्ये गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शुक्रवारी (ता. ३०) धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, १००० क्युसेकने विसर्ग नदीपात्रात सोडला आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला असल्याची माहिती धरणाचे सहायक अभियंता सौरभ पिंगळे यांनी दिली. गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असणाऱ्या किल्ले तोरणा परिसरातील घिसर, अंत्रोली, कोदापूर, निव्ही, घेवंडे, या ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने गतवर्षी १४ ऑगस्टला भरलेले धरण या वेळी पंधरा दिवस अगोदर म्हणजे भरले आहे. धरणाची साठवण क्षमता ३. ६९ टीएमसी एवढी असून, शुक्रवारी ३.६० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अद्यापही जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाचे दोन्ही स्वयंचलीत दरवाजे उघडले असून, त्यामधून एक हजार क्यूसेकने विसर्ग चालू आहे. गुंजवणी धरण शंभर टक्के भरल्याने धरणाचे सहायक अभियंता सौरभ पिंगळे यांनी सपत्नीक धरणाच्या पाण्याचे पूजन केले. या वेळी कोदापूरचे माजी सरपंच भिमाजी देवगिरीकर उपस्थित होते. `उजनी`ची पाणी पातळी  अखेर ५० टक्क्यांपर्यंत सोलापूर ः उजनी धरणाकडे येणाऱ्या दौंडकडील विसर्गात घट होत असली, तरी त्यात सातत्य आहे. त्यामुळे उजनी धरणाची पाणीपातळी संथ गतीने पन्नाशीकडे वाटचाल करत आहे. शनिवारी (ता.३१) सकाळी धरणाने ४८.४० टक्के इतकी पातळी गाठली. सायंकाळपर्यंत ती ५० टक्कयापर्यंत पोचण्याचा अंदाज आहे.  उजनी धरणाच्या वरच्या बाजूला भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसाने २२ जुलैपासून गेल्या आठ ते दहा दिवसांत ५० टक्के पाणी पातळी वाढली आहे.  २२ जुलै रोजी उजनी धरण उणे पातळीतून बाहेर आले. गेल्या तीन वर्षात प्रथमच उजनी जुलैमध्ये पन्नास टक्के भरणार आहे. मात्र २५ जुलैपासून पुणे जिल्ह्यातील पावसाने उसंत घेतल्याने दौंड येथील विसर्गात घट होण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे उजनी पन्नाशीकडे संथ गतीने वाटचाल करत आहे. दौंड येथून ११ हजार ९४५ क्युसेक विसर्ग उजनीत होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com