पुणे जिल्ह्यात ७७ लाख टन उसाचे गाळप

साखर कारखान्यांचा गाळप हंगाम मध्यावर आला आहे. पुणे जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण १६ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगाने सुरू आहे.
पुणे जिल्ह्यात ७७ लाख टन उसाचे गाळप
77 lakh tonnes of sugarcane crushed in Pune district

पुणे ः साखर कारखान्यांचा गाळप हंगाम मध्यावर आला आहे. पुणे जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण १६ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ७७ लाख ३० हजार १५२ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ७७ लाख १३ हजार ३९० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा सरासरी ९.९८ टक्के एवढा आहे.  

शासनाने १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात १६ ऑक्टोबरपासून कारखाने सुरू झाले आहे. जिल्ह्यात जवळपास १८ साखर कारखाने आहेत. त्यापैकी १६ कारखान्यांनी गाळपासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये सहकारी १० व खासगी १६ साखर कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता ८६,२५० टन एवढे आहे. 

गेल्या महिन्यात मॉन्सूनोत्तर पावसाने चांगलाच दणका दिला होता. साखर कारखान्याच्या गळीत हंगामात काही प्रमाणात अडचणी आल्या होत्या. अनेक ठिकाणी उसामध्ये पाणी साचल्याने ऊसतोड बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे बहुतांश साखर कारखान्याचा गळीत हंगाम धीम्यागतीने सुरू होता. चालू जानेवारी महिन्यात गळीत हंगामाला चांगलाच वेग आला. हंगामात एकूण १३८ लाख टन उसाचे गाळप करण्याचे नियोजन कारखान्यांनी केले आहे. त्यापैकी सुमारे १३१ लाख टन उसाचे गाळप होण्याचे अपेक्षित आहे. त्यातून १४५ लाख टनांहून अधिक साखर उत्पादन होईल, असा पुणे प्रादेशिक कार्यालयाचा अंदाज आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या गाळपामध्ये बारामती अॅग्रोने सर्वाधिक आघाडी घेतली आहे. या कारखान्याने आठ लाख ५१ हजार ६० टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून सात लाख ६ हजार ६५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर साखर उतारा सरासरी ८.३० टक्के एवढा आहे. शिरूरमधील घोडगंगा साखर कारखान्याने साखर उताऱ्यात आघाडी घेतली आहे. या कारखान्याला ११.२० टक्के एवढा साखर उतारा आहे. भोरमधील राजगड सहकारी साखर कारखान्याने सर्वात कमी गाळप केले आहे. आतापर्यंत २८ हजार ३७३ टन एवढे गाळप केले आहे. त्यातून २६ हजार २७५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून साखर उतारा सरासरी ९.२६ टक्के एवढा आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com