अकोल्यातील ७७ गावे संभाव्य पूरबाधित यादीत

जिल्ह्यात यंदा ७७ संभाव्य पूरबाधित ठिकाणे असून, या गावांना पुरापासून होणाऱ्या परिणामापासून दूर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे.
अकोल्यातील ७७ गावे संभाव्य पूरबाधित यादीत
अकोल्यातील ७७ गावे संभाव्य पूरबाधित यादीत

अकोला ः पावसाचे दिवस सुरू झाले असून, येत्या काळात वेळप्रसंगी उद्‍भवणाऱ्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली. जिल्ह्यात यंदा ७७ संभाव्य पूरबाधित ठिकाणे असून, या गावांना पुरापासून होणाऱ्या परिणामापासून दूर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील उमा, काटेपूर्णा, शहानूर, मोर्णा, मन, निर्गुणा, आस, वान, गांधारी व मस नद्यांना दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये अधिक पाऊस पडतो. त्यामुळे पूर वाढतो. जीवितहानी, संपत्तीचे नुकसान, गुरे पशुधनहानी, वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. बाधित गावांची तालुकानिहाय संख्या ः अकोला १२, बार्शीटाकळी १२, अकोट १०, तेल्हारा ११, बाळापूर ०८, पातुर १०, मूर्तीजापूर १४.

जिल्ह्यातील पूरप्रवण गावे अकोला तालुका- म्हैसांग, एकलारा, कपिलेश्‍वर, वडद बुद्रुक, दोनवाडा, गांधीग्राम, धामना, चांगेफळ, म्हैसपूर, चांदूर, सांगवी बुद्रुक, कुरणखेड, बार्शीटाकळी तालुका - चिंचखेड, निंभोरा, तामशी, खांबोरा, वरखेड, वाघजळी, दोनद खु., टाकळी, राजंदा, सिंदखेड, सुकळी, अकोट तालुका- केळीवेळी, किनखेड, पळसोद, पनोरी, पिलकवाडी, कुटासा, मडगाव, अकोट, करोडी, वरूर, तेल्हारा तालुका- मनात्री बुद्रुक, डवला, तळेगाव वडनेर, तळेगाव पातुर्डा, नेर, सांगवी, उमरी, पिळवंद, दानापूर, सौंदळा, वारखेड, बाळापूर तालुका - वाडेगाव, बाभुळखेड, कासारखेड, हाता, अंदुरा, लोहारा, कवठा, हातरूण, पातुर तालुका- पास्टुल, भंडारज खुर्द, आगीखेड, कोठारी बुद्रुक, चोंढी, विवरा, आलेगाव, वहाळा बुद्रुक, सस्ती, तुलंगा, मूर्तिजापूर तालुका - हेंडज, पिंगळा, कोळसरा, भटोरी, दातवी, सांगवी, दुर्गवाडा, दापूरा, हिवरा कोरडे, लाखपूरी, पोही, उनखेड, मंडुरा, माना.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com