नांदेड जिल्ह्यात आचारसंहितेने नुकसानग्रस्तांचे ९१३ कोटी ‘होल्ड’वर !

नांदेड : जिल्ह्यातील साडेआठ लाख नुकसानग्रस्तांना भरपाईसाठीचे९१३ कोटी रुपये निवडणूक आचारसंहितेमुळे सध्या ‘होल्ड’वर आहेत.
नांदेड जिल्ह्यात आचारसंहितेने नुकसानग्रस्तांचे ९१३ कोटी ‘होल्ड’वर !
नांदेड जिल्ह्यात आचारसंहितेने नुकसानग्रस्तांचे ९१३ कोटी ‘होल्ड’वर !

नांदेड : जिल्ह्यातील साडेआठ लाख नुकसानग्रस्तांना भरपाईसाठी नव्या निकषानुसार लागणाऱ्या ६११ कोटींपैकी ४५५ कोटी जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. तसेच पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत मंजूर झालेला ४५८ कोटींचा परतावा मंजूर आहे. असे एकूण ९१३ कोटी रुपये निवडणूक आचारसंहितेमुळे ही रक्कम सध्या ‘होल्ड’वर पडले आहेत. जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती उद्‌भवली होती. यामुळे साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या सहा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. याबाबत जुलै महिन्यातील नुकसान भरपाईसाठी प्रचलित दरानुसार ३० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. तर जुलै व ऑगस्टमध्ये नुकसान झालेल्यांसाठी ७५ टक्के भरपाईनुसार ४२५ कोटी, असे एकूण ४५५ कोटी जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. तसेच प्रधानमंत्री पीकविमा योजनेत खरीप हंगामात नऊ लाख दहा हजार शेतकऱ्यांनी सहा पिकांसाठी विमा भरून योजनेत सहभाग घेतला होता. यामुळे नांदेडमधील शेतकऱ्यांना सात लाख २० हजार ४४३ शेतकऱ्यांना ४५८ कोटी ८९ लाख ७३ हजार ७११ रुपयांचा विमा परतावा मंजूर झाला आहे. या परताव्याची रक्कमही कंपनीस्तरावर प्रलंबित आहे. देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता पाच नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार असल्याने यानंतरच ९१३ कोटी रुपयांच्या वितरणाचा मार्ग मोकळा होईल, अशी सूत्रांनी दिली. जुलैसाठी १४ कोटींची आवश्यकता जुलैमधील नुकसान भरपाईबाबत प्रचलित दरानुसार ३० कोटी प्राप्त झाले आहेत. परंतु नव्या निकषानुसार ४४ कोटी रुपये लागतात. सध्या जिल्ह्याकडे ३० कोटी वाटपाचा प्रश्‍न पडला आहे. यामुळे वाढीव दरानुसार अतिरिक्त १४ कोटी रुपयांची गरज आहे. अतिरिक्त निधी वेळेवर आला नाहीत तर शेतकऱ्यांना भरपाई वितरित करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर अडचणी निर्माण होऊ शकतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com