सांगली जिल्ह्यातील क्षारपड जमीन सुधारणेसाठी ९३ कोटी मंजूर

जिल्ह्यातील क्षारपड जमिनीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. तो आता जलसंपदा विभागाच्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाअंतर्गत मार्गी लागणार आहे. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून भूमीगत चर योजना तयार करण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील कवठेपिराण, उरण इस्लामपूर, आष्टा, कसबे डिग्रज व बोरगाव या गावांतील क्षारपड जमीन विकासासाठी ९३ कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
93 crore sanctioned for improvement of saline land
93 crore sanctioned for improvement of saline land

सांगली ः जिल्ह्यातील क्षारपड जमिनीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. तो आता जलसंपदा विभागाच्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाअंतर्गत मार्गी लागणार आहे. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून भूमीगत चर योजना तयार करण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील कवठेपिराण, उरण इस्लामपूर, आष्टा, कसबे डिग्रज व बोरगाव या गावांतील क्षारपड जमीन विकासासाठी ९३ कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीपैकी ८० टक्के निधी शासन व २० टक्के निधी शेतकऱ्यांनी द्यावयाचा आहे. हा प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.  मिरज तालुक्यातील कवठेपिराण येथे जलसंपदा विभागाच्या वतीने क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाअंतर्गत पथदर्शी भूमिगत चर योजनेचा शुभारंभ व शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेणे कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय पुणेचे अधीक्षक अभियंता बापूसाहेब गाडे, कार्यकारी अभियंता प्रिया लांजे, कार्यकारी अभियंता राजेंद्र गाजी, शाखा अभियंता निशिकांत टिबे, उपविभागीय अभियंता राहुल घनवट, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य भीमराव सांगली जिल्ह्यात कृष्णा व वारणा काठावर बऱ्याच जमिनी क्षारपड झालेल्या आहेत. त्यामुळे त्या नापिक झाल्या आहेत. तसेच काही जमिनी अतिपाण्यामुळे क्षारपड होण्याच्या मार्गावर आहेत. सांगली जिल्ह्यातील जमिनी क्षारपड मुक्त करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प पाच गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कवठेपिराण गावात ३८ कोटींची कामे करण्यात येणार असून यामुळे सुमारे ४ हजार एकर, उरुण इस्लामपूरसाठी सुमारे ८४० हेक्टरसाठी १९ कोटी ७९ लाख, आष्टासाठी सुमारे ६९९ हेक्टरसाठी १४ कोटी ६४ लाख, कसबे डिग्रजसाठी सुमारे ७५२ हेक्टरसाठी १० कोटी ८६ लाख तर बोरगावसाठी सुमारे ४८९ हेक्टरसाठी १० कोटी ५ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.  ही पथदर्शी योजना ‍जिल्ह्यातील क्षारपड जमीन विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शासनास आपले संमतीपत्र देणे बंधनकारक असून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करणार  सदरची योजना राज्यासाठी दिशादर्शक ठरेलच पण तरीही यासाठी २० टक्के रक्कम ही शेतकऱ्यांनी देणे अपेक्षित आहे. पण काही शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही कमकुवत असते किंवा ते देणे त्यांना जिकीरीचे होऊ शकते यासाठी उपाययोजना म्हणून अशा शेतकऱ्यांना विकास सोसायट्यांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com