९३ लाख शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणी

महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ई-पीक पाहणी ॲपवर ९३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई- पीक नोंदणी पूर्ण केल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत दिली.
९३ लाख शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणी
93 lakh farmers conducted e-crop survey

मुंबई : महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ई-पीक पाहणी ॲपवर ९३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई- पीक नोंदणी पूर्ण केल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत दिली.

राज्यात ई-पीक पाहणी ॲपची सक्ती न करण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा सदस्य संग्राम थोपटे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

श्री. थोरात म्हणाले, की ई-पीक पाहणी हे सहजता, पारदर्शकता आणि बिनचूकता यासाठी महत्त्वाचे असून हा प्रयोग देशपातळीवरही अवलंबला जाईल, अशी खात्री आहे. ई- पीक पाहणी हा कार्यक्रम टाटा ट्रस्टच्या सहकार्याने १५ ऑगस्ट २०२१ पासून राज्यभरात राबविण्यात येत आहे. या पीक पाहणीचा उपयोग महसूल विभागाबरोबरच कृषी, पणन आणि नियोजन विभागाला होणार आहे. एका अँड्रॉइड फोनमधून साधारण ५० शेतकऱ्यांच्या पिकांची नोंदणी करण्यात येते त्यामुळे जेथे नेटवर्क नाही अशा ठिकाणी नोंदणी करताना काळजी घेण्यात येत आहे.  

बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी मार्गदर्शन ः भुमरे मुंबई : बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणाकरिता शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन करण्यात आल्याचे फलोत्पादनमंत्री संदीपानराव भुमरे यांनी विधानसभेत सांगितले. सीताफळांवर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर करण्यात आलेल्या उपाययोजना याबाबतचा प्रश्‍न विधानसभा सदस्य अमिन पटेल यांनी  प्रश्‍नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

प्रतिबंधासाठी पथकाची स्थापना’ गेवराई तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. या भरारी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर २०२१ या काळात ५१ प्रकरणांत १ कोटी २१ लाख ७९ हजार एवढी दंडात्मक कारवाई केल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सांगितले.

 केळी उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई ः दादा भुसे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी पीकविम्याची नुकसानभरपाई भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत अदा करण्यात आल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविम्याची नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा प्रश्‍न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा सदस्य कुणाल पाटील, शिरीष चौधरी, किशोर पाटील यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. श्री. भुसे म्हणाले, की आंबिया बहर २०१९-२० मध्ये केळी या फळपिकासाठी जळगाव जिल्ह्यातील ४२ हजार ३७७ शेतकऱ्यांनी ५४ हजार ३५४ हेक्टर क्षेत्राकरिता सहभाग नोंदविला होता. योजनेतील अटी- शर्ती आणि महावेध प्रकल्पामार्फत प्राप्त हवामानाच्या आकडेवारीनुसार ४१ हजार ५७८ शेतकऱ्यांना ३७१.९४ कोटी रुपये इतकी विमा नुकसानभरपाई भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत अदा करण्यात आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com