पीकविमा न मिळाल्यास अन्नत्याग आंदोलन

औरंगाबाद: ‘‘आमचा फळपीक विमा व इतर पिकांचा विमा रक्कम न मिळाल्यास आम्ही औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी येत्या ७ दिवसांनंतर १० जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अन्नत्याग आंदोलन करू,’’ असा इशारा फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना सोमवारी (ता.३)निवेदनातून दिला आहे.
पीकविमा न मिळाल्यास अन्नत्याग आंदोलन
Abstinence movement if crop insurance is not available

औरंगाबाद: ‘‘आमचा फळपीक विमा  व इतर पिकांचा विमा रक्कम न मिळाल्यास आम्ही औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी येत्या ७ दिवसांनंतर १० जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अन्नत्याग आंदोलन करू,’’ असा इशारा फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना सोमवारी (ता.३)निवेदनातून दिला आहे.

आंबिया बहार व मृग बहार २०२०-२१ व २०१९-२० मधील मोसंबी, डाळिंब व द्राक्ष पीकविमा व तसेच सर्व भुसार पिकांचा विमा मिळण्यासाठी फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी पालकमंत्री देसाई यांना निवेदन दिले.  शेतकऱ्यांच्या निवेदनानुसार, डाळिंब, मोसंबी द्राक्ष आंबा या फळ पिकांवरती आंबिया बहारात हवामान आधारित फळपीक विमा  २०२०/२१ यावर्षी भरला. तसेच काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील  विमा भरलेल्या क्षेत्रापैकी उर्वरित क्षेत्रावर मृग बहार २०२१ मध्ये फळपीक विमा भरला होता. जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यात चालू हंगामात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली.

परिणामी फळबाग पिकांचे १०० टक्के नुकसान झाले.  कृषिमंत्री दादा भुसे व फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री  संदीपान भुमरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी पाहणी दौरे केले. राज्यातील इतर ठिकाणी पर्जन्यमापक नोंदीवर विमा मंजूर झाला. परंतु औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत कोणताही विमा  शेतकऱ्यांना मिळालेला नाही. 

औरंगाबाद तालुक्यात ऑनलाइन नुकसान तक्रार न केल्याच्या कारणास्तव गोंधळ दाखवून विमा नामंजूर करण्यात आला. फळपीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी कंपनीला त्वरित सूचना द्यावी, असे निवेदनात नमूद आहे. नंदकिशोर सांळुखे, शरद रोडे, सचिन खलसे, जगन्नाथ वाघ, विलासराव गव्हाड, पांडुरंग वाघ, अनिल रोडे, अतुल गावंडे, गणेश पवार, मुकुंद साळुंके, शिवचरण सांळुके आदी शेतकरी उपस्थित होते.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.