खानदेशात खरिपासाठी मुबलक युरिया उपलब्ध

जळगाव ः लॉकडाउन व इतर कारणांमुळे खानदेशात गेल्या खरिपात युरिया, १०.२६.२६, पोटॅश आदी खतांची टंचाई जाणवली.
Abundant urea available for kharif in Khandesh
Abundant urea available for kharif in Khandesh

जळगाव ः लॉकडाउन व इतर कारणांमुळे खानदेशात गेल्या खरिपात युरिया, १०.२६.२६, पोटॅश आदी खतांची टंचाई जाणवली. दाणेदार सुपर फॉस्फेटही मिळत नव्हते. परंतु लॉकडाउन दूर झाल्याने खतांचा पुरवठा सुरळीत झाला आहे. खतांचा साठा बऱ्यापैकी असून, आगामी खरिपात टंचाई दूर होण्यास मदत होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. 

युरियाची मोठी टंचाई खरिपात जाणवली. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला. नंतर खतांचा पुरवठा सुरळीत झाला. पण अतिवृष्टीमुळे खरिपात खतांचा उपयोग होऊ शकला नाही. खरिपातील खतांचा पुरवठा व्यवस्थित झाला. रब्बीतदेखील खतांचा पुरवठा सुरळीत झाला आहे.

खरिपात साडेतीन लाख टन खतांचा पुरवठा करण्याची मंजुरी होती. यातील ९० टक्के खतांचा पुरवठा झाला. त्यात सव्वालाख टन युरियाचा समावेश होता. यातील एक लाख टनांपेक्षा अधिक युरियाचा पुरवठा झाला आहे. तर सरळ खतांमध्ये पोटॅश, सुपर फॉस्फेटचा पुरवठादेखील ९० टक्के झाला. 

रब्बीमध्ये सुमारे सव्वा दोन लाख टन खतपुरवठा खानदेशसाठी मंजूर होता. यातील खतांचा ७० टक्के पुरवठा झाला. रब्बीत कोरडवाहू ज्वारी, हरभरा या पिकांसाठी खतांचा कुठलाही उपयोग झालेला नाही. हरभरा व त्यापाठोपाठ ज्वारी पीक आहे. फक्त मका, बाजरी, कांदा, संकरित ज्वारीसाठी खतांची गरज भासली. त्यातही मिश्र खतांचा उपयोग अधिक झाला. १०.२६.२६, डीएपी, पोटॅश, फॉस्फेटचा उपयोग अधिक झाला. युरियाची मागणी अधिक नव्हती. 

जळगाव जिल्ह्यात सुमारे २० हजार टनांपेक्षा अधिक युरियाचा साठा आहे. धुळे जिल्ह्यात साठा फारसा नाही. परंतु तेथेही पुरवठा सुरळीत होत आहे. रब्बीमधील खतांचा अंतिम पुरवठा या महिन्यात होईल. नंतर खरिपातील खतपुरवठा सुरू होईल. युरियासह पोटॅश, १०.२६.२६ या खतांचा मुबलक साठा असल्याने खरिपात टंचाई जाणवणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com